Javed Akhtar and Family Saam Tv
मनोरंजन बातम्या

Javed Akhtar: कदाचित मी उत्तम वडील नसेन... जावेद अख्तर यांना असं का वाटतं?

जावेद अख्तर यांना एकदा तुम्ही 'उत्तम वडील' आहात का असा प्रश्न विचारण्यात आला होता.

Chetan Bodke

Javed Akhtar: बॉलिवूडचे सुप्रसिद्ध लेखक आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांचा आज ७८ वा वाढदिवस. जावेद अख्तर एका जुन्या व्हिडिओतील वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. जावेद अख्तर यांना एकदा तुम्ही 'उत्तम वडील' आहात का असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी मी कदाचित 'उत्तम वडील' नसावा असे उत्तर दिले होते. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आणि मुलांमधील नातेसंबंधांवर भाष्य केले.

2001 मध्ये फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीदरम्यान जावेद अख्तर यांना एका मुलाखतीत विचारण्यात आले होते की, आपल्या मुलांसाठी तुम्ही 'उत्तम वडील' आहात का? यावेळी जावेद अख्तर म्हणतात, "नात्याप्रमाणे माझ्यात आणि मुलांमध्ये कधीही संवाद होत नव्हता. पण फरहान, झोया आणि माझ्यातील संबंध फारच घनिष्ठ होते. संवादाविना ही आमच्यातील नाते फारच वेगळे होते. अशी कोणतीच गोष्ट नव्हती की माझे मुलं त्या विषयावर माझ्याशी चर्चा करू शकत नाहीत."

सोबतच जावेद अख्तर पुढे म्हणतात, "यामुळे आमच्यात चर्चेदरम्यान अनेकदा वाद ही झाले होते, पण विचारांमुळे स्वतंत्र्य असल्याने मत- मतांतर होते. त्यामुळे आमच्या नात्यावर कोणताच फरक पडला नव्हता. पण सकारात्मक बाजूने विचार करता माझ्या मुलांनी नेहमीच माझा आदर केला. आमच्यात नेहमीच अत्यंत उत्कृष्ट आणि मैत्रीपूर्ण संबंध होते. आज, माझे मुलं आणि मी सर्वोत्कृष्ट मित्र आहोत."

जावेद अख्तर यांनी नुकतेच त्यांचे नवीन जादुनामा हे पुस्तक गुलजार यांच्या हस्ते प्रकाशित केले. या पुस्तकाचे शीर्षक पटकथा लेखकाच्या जादू या टोपणनावावरून घेतले आहे. त्यांची जाहीर भाषणे, मुलाखती आणि काही वाक्य या सर्वांचा वापर करत हे पुस्तक तयार केले आहे.

पटकथा लेखकांची संकल्पना समोर ठेवत जावेद अख्तर यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. जावेद अख्तर आणि सलीम खान या दोघांनाही 'हाथी मेरे साथी'मध्ये लेखक म्हणून पहिली संधी देण्याचे श्रेय राजेश खन्ना यांना दिली जाते.

या जोडीने सीता और गीता, दीवार, शोले, डॉन आणि मिस्टर इंडिया सारख्या अनेक चित्रपटांची पटकथा लिहिली. नंतर, 1982 मध्ये ते वेगळे झाले. बेताब, सागर, मेरी जंग, खेल, रूप की रानी चोरों का राजा, लक्ष्य आणि डॉन: द चेस बिगिन्स अगेन ही त्यांची वैयक्तिक पटकथा लेखक म्हणून काही उत्कृष्ट कामे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : कपड्याच्या दुकानातून पावणे चार लाखांची रोकड लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

VIDEO : केलंय काम भारी, लुटली तिजोरी; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

SCROLL FOR NEXT