Urfi Javed Vs Chitra Wagh: माझ्यावर हल्ला होऊ शकतो, उर्फीच्या तक्रारीत थेट चित्रा वाघ यांचं नाव, अडचणी वाढणार

मुंबई पोलीस आयुक्तांना रूपाली चाकणकर यांचे पत्र.
Urfi Javed, rupali chakankar, chitra wagh
Urfi Javed, rupali chakankar, chitra waghSaam Tv

Urfi Javed-Chitra Wagh Controversy: उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांचा वाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी उर्फी विरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर उर्फीने महिला आयोगाकडे चित्रा वाघ यांची तक्रार केली. उर्फीच्या तक्रारीची दाखल घेत महाराष्ट्र राज्य महिला अयोग्य अध्यक्षा रूपाली चाकरणकर यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी उर्फी जावेदलाची पाठराखण केली आहे. तसेच त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, उर्फी जावेद यांनी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. उर्फी यांना मुंबई सारख्या शहरात असुरक्षित वाटत आहे. तरी मुंबई पोलिसांनी तात्काळ कारवाई करून त्याच्या अहवाल राज्य महिला आयोगास सादर करावा.'

Urfi Javed, rupali chakankar, chitra wagh
Aishwarya Rai: ऐश्वर्याला सिन्नरमधील जमिनीबाबत तहसीलकडून नोटीस, काय आहे प्रकरण?

महाराष्ट्र राज्य महिला आयोगास उर्फी जावेद यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. यामध्ये अर्जदार असे नमूद करतात की,"मी सिनेसृष्टीशी संबंधित असलेल्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे, माझं राहणीमान आणि दिसणं व्यावसायिक दृष्ट्या आवश्यक आहे,

असे असतानाही त्याबाबत नाहक तक्रारी करून चित्रा किशोर वाघ यांनी केवळ स्वतःच्या राजकीय फायद्याकरिता किंवा वैयक्तिक प्रसिद्धीकरीता मला मारहाण करण्याच्या धमक्या प्रसारमाध्यमावरून जाहीरपणे दिल्या आहेत, सबब माझ्यावर हल्ला होऊ शकतो. त्यामुळे मला असुरक्षित वातावरण निर्माण होऊन मला मुक्तपणे वावरता येत नाही. म्हणून मला सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी."

मुक्त संचाराचा हक्क घटनेने प्रत्येक भारतीयाला दिला आहे, महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईसारख्या शहरात असुरक्षित वाटणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांनी यावर तात्काळ कारवाई करावी व केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल राज्य महिला आयोगास सादर करावा.

चित्रा वाघ यांनी उर्फी विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर मुंबई पोलीसांनी उर्फीची ३ तास चौकशी केली होती. त्यानंतर उर्फीने महिला आयोगाकडे चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रार केली. उर्फी आणि चित्रा वाघ यांचा वाद गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com