मुंबई : वेबसिरीज 'IC 814: The Kandahar Hijack' ही सध्या खूप चर्चेत आहे. या सेरीजवर बहिष्कार टाकला जावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. १९९९ च्या विमान हायजॅकच्या घटनेत सहभागी असलेल्या दहशतवाद्यांची खरी ओळख लपवण्यात आलीय, असा आरोप करण्यात आला आहे. ही वेबसिरीज चांगलीच वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.
या वेब सीरिजचं दिग्दर्शन अनुभव सिन्हा यांनी केलंय. ही वेबसिरीज २४ डिसेंबर १९९९ रोजी काठमांडू येथून उड्डाण केल्यानंतर ४० मिनिटांत ५ दहशतवाद्यांनी भारतीय विमानाचं अपहरण केलं होतं, या घटनेवर आधारित आहे. ही वेबसिरीज २९ ऑगस्टपासून नेटफ्लिक्सवर प्रसारित होत आहे. निर्मात्यांनी अपहरणकर्त्यांची नावे बदलली आहेत. विशिष्ट समुदायातील दहशतवाद्यांची नावे लपवून त्यांना शंकर आणि भोला नावं दिलं गेल्याचा आरोप केला जातोय.
कंदहार हायजॅकची खरी कहाणी काय?
कंदहार हायजॅकची खरी कहाणी आपण सविस्तक जाणून घेवू या. पाकिस्तानी गुप्तचर संस्थेने C-814 हायजॅक करण्याचा कट रावळपिंडी जीएचक्यू येथे रचला होता. हरकत-उल-अन्सारचे सरचिटणीस मसूद अझहरची जम्मू तुरुंगातून सुटका करण्यासाठी भारत सरकारला भाग पाडणे, हा यामागील उद्देश होता. यापूर्वी १५ जुलै १९९९ रोजी कोट बलवाल (What Is IC 814 hijacking Kandahar plane hijack story) येथे जेलब्रेक दरम्यान त्याचा सहकारी कमांडर सज्जाद अफगानी मारला गेला होता. मसूद अझहरचा भाऊ मोहम्मद इब्राहिम अथर अल्वी याला भीती होती की, भारतीय गुप्तचर संस्था त्यालाही मारतील. अशा स्थितीत त्याने आपल्या साथीदारांसह काठमांडूमध्ये आयएसआय नेटवर्कचा वापर करून अपहरण घडवून आणलं होतं.
दहशतवादी संघटना स्थापन
भारतीय गुप्तचर विभागाला या अपहरण योजनेची कोणतीही भनक लागलेली नव्हती. IC-814 फ्लाइटमध्ये एक रॉ ऑपरेटर आधीच उपस्थित होता. तो २०२२ मध्येच रॉमधून निवृत्त झाला होता. काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानानं उड्डाण केलं होतं. यातील बहुतांश भारतीय प्रवासी दिल्लीला येत होते. विमानाने भारतीय हवाई हद्दीमध्ये प्रवेश करताच अपहरणकर्त्यांनी विमानाचा ताबा घेतला होता. त्यांनी पायलट आणि प्रवाशांना बंदुकीचा धाक दाखवला. यानंतर विमान दिल्लीहून पाकिस्तानकडे वळवण्यात (Kandahar plane hijack) आलं. अफगाणिस्तानमध्ये नेण्यासाठी विमानात पुरेसे इंधन शिल्लक नव्हते. अशा स्थितीत विमान त्यांनी अमृतसरमार्गे लाहोरला नेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी विमान लाहोरहून दुबईसाठी निघालं. तेथून थेट अफगाणिस्तानातील कंदाहारला पोहोचलं होतं.
यावेळी अपहरणकर्त्यांनी भारत सरकारसमोर आपल्या मागण्या मांडण्यास सुरुवात केली होती. भारतीय तुरुंगात बंद असलेल्या दहशतवाद्यांच्या सुटकेची मागणी त्यांनी केली. शिवाय दोनशे अमेरिकन डॉलरची खंडणी देखील मागितली (Pakistan terror) होती. मसूद अझहरसह भारतीय कैदेत असलेल्या ३६ दहशतवाद्यांची सुटका करण्याची मागणी त्यांनी केली होती. भारत सरकारने या प्रकरणी अपहरणकर्त्यांशी वाटाघाटी सुरू ठेवल्या. तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंग हे तीन दहशतवादी मुश्ताक अहमद जरगर, अहमद उमर सईद शेख आणि मौलाना मसूद अझहर (masood azhar) यांना कंदहारला घेऊन गेले होते. याच मसूद अझहरने नंतर जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना स्थापन केली होती. ती २०१९ च्या पुलवामा हल्ल्यात सहभागी होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.