व्हिडीओ शेअर करत, सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सापते यांची आत्महत्या  Saam Tv
मनोरंजन बातम्या

व्हिडीओ शेअर करत, सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सापते यांची आत्महत्या

टीव्ही जगातले सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सापते यांनी आत्महत्या केली आहे. सोबतच त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे.

गोपाल मोटघरे

पुणे : टीव्ही जगातले सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सापते Raju Sapte यांनी आत्महत्या Suicide केली आहे. सोबतच त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ Video प्रसिद्ध केला आहे. त्यांनी त्या व्हिडीओ मध्ये म्हटले आहे की, काम करत असताना एका युनियनच्या पदाधिकारी त्रास देत असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्याच्या Pune राहत्या घरी त्यांनी आत्महत्या केली आहे. Well known art director Raju Sapte commits suicide

त्यांनी आत्महत्येपूर्वी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी आपल्या आत्महत्येचे कारण आणि आपल्या व्यथा सांगितल्या स्पष्ट केल्या आहेत.

हे देखील पहा-

राजू सापते काय म्हणले ?

आत्महत्येपूर्वी राजू यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये म्हणतात, ‘नमस्कार मी राजेश मारुती सापते. मी आर्ट डिरेक्टर आहे. मी आता कोणत्याही प्रकारची नशा केलेली नाही. मी पूर्ण विचाराअंती हा निर्णय घेत आहे. कारण मला काही गोष्टींचा खूप त्रास होत आहे. त्यातली ही गोष्ट आहे की, राकेश मौर्या जे लेबर युनियनमधून आहेत, ते मला खूप त्रास देत आहेत.

माझं कुठच्याही प्रकारचं पेमेंट तिथे थकीत नाही. सगळं पेमेंट रेग्युलरली दिलेलं आहे. माझी कुठलीही कम्प्लेंट तिकडे नाही. राकेश मौर्या युनियनमधल्या काही लेबर लोकांना मुद्दामून फोन करून त्यांच्याकडून ते वदवून घेत आहेत की राजू सापतेने पैसे दिलेले नाहीत.’ असा धक्कादायक आरोप झाल्याचे त्यांनी आपल्या व्हिडिओत सांगितले आहे.

पुढे ते म्हणतात ‘हे कालही मी क्लीअर केलं आहे, नरेश मेस्त्री नामक व्यक्तीने फोन करून विचारले असता त्यांनीही सांगितले की माझे पेमेंट पूर्ण आहे. नरेश मेस्त्रींनी हेही सांगितलं की आजपर्यंत दादांनी कोणतही पेमेंट अर्धवट केलेलं नाही. तरीही राकेश मौर्या हे मला खूप सतवत आहेत. ते माझं कुठचंही काम सुरु होऊ देत नाही आहेत. सध्या माझ्याकडे 5 प्रोजेक्ट आहेत, ज्याचे काम मला तत्काळ सुरु करायचे आहे.

त्यातलं काल एक प्रोजेक्ट झी ZEE चे मला सोडून द्यावं लागलं. कारण मला ते कामच करू देत नाहीयत. तसंच दशमी क्रिएशनचं काम सुरु असताना त्यांनी ते थांबवलं आहे. या गोष्टीचा निषेध म्हणून मी आज आत्महत्या करत आहे. तरी मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaye Khanna-Sunny Deol: अक्षय खन्ना आणि सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र; 'बोर्डर'नंतर 'या' चित्रपटात करणार काम

Bhendi Facepack : नैसर्गिक ग्लो मिळवण्यासाठी लावा भेंडीचा फेस पॅक

Relationship Tips: नवरा बायकोचं लग्नानंतर बोलणं कमी झालंय? 'या' टिप्स करा फॉलो, नातं होईल घट्ट

Bhakri Making Tips : भाकरी थापताना तुटते? टेन्शन घेऊ नका, फक्त 'या' सोप्या टिप्स वापरा

लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचं गिफ्ट, 2100 नाहीतर 4500 मिळणार|VIDEO

SCROLL FOR NEXT