Salman Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salman Khan: भाईजानकडून वाढदिवसानिमित्त चाहत्यांना अनोखी भेट !

सलमानच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या आयुष्यातील काही खास क्षणचित्रे घेत डॉक्युमेंट्री चित्रीत करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: सलमान (Salman Khan) आपल्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या चाहत्यांकरिता एक मोठे सरप्राईज देणार आहे. त्यामुळे सर्वच त्याचे चाहते त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सलमान आपल्या वाढदिवसाच्या दिवशी एक डॉक्युमेंट्री प्रदर्शित (Documentary Release) करणार आहे. त्याच्या आयुष्यावर ही डॉक्युमेंट्री चित्रीत करण्यात आली आहे. त्याच्या आयुष्यातील अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळणार आहेत. त्या डॉक्युमेंट्रीवर अनेक दिवसांपासून काम सुरु आहे. सलमानच्या आगामी डॉक्युमेंट्रीचे नाव 'बियॉन्ड द स्टार' (Beyond The Star) असे आहे. त्याच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलेले कलाकार, त्याच्यासोबत नेहमीच राहणारा मित्रपरिवार डॉक्युमेंट्रीत दिसणार आहेत.

भाग्यश्री, दिशा पटानी, साजिद नाडियाडवाला, डेविड धवन, संजय लीला भन्साळी, सुभाष घई, सूरज बडजात्या असे अनेक दिग्गज मंडळी त्याच्या डॉक्युमेंट्रीत झळकणार आहेत. सोबतच हिमेश रेशमिया आणि कमाल आर खान सारखे कलाकार या डॉक्युमेंट्रीत दिसणार आहेत. अद्याप या डॉक्युमेंट्रीची प्रदर्शनाची तारीख निर्मात्यांनी जाहिर केलेली नाही परंतु, सलमान खानच्या वाढदिवसाच्या दिवशी अर्थात २७ डिसेंबरला प्रदर्शित होऊ शकते.

'पीटीआय' (PTI) या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीप्रमाणे, सलमानच्या या डॉक्युमेंट्रीचा विषय त्याची मैत्रिण, रोमानिया देशातील अभिनेत्री यूलिया वंतूर हीने दिली होती. यामध्ये सलमानच्या आयुष्यातील प्रत्येक खास क्षण यामध्ये घेण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai : गटाराच्या पाण्यात महिलेने धुतली भाजी, नवी मुंबईतील प्रकार; किळसवाणा Video Viral

Ayushman Bharat Scheme: उपचार करायचाय? पण आयुष्मान कार्ड हरवलंय, तर कसा होणार मोफत उपचार? काय आहे नियम

Maharashtra Rain Live News : - सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

Heavy Rain : मुसळधार पावसाचा हाहाकार; कल्याण- डोंबिवलीतील सखल भागात पाणी, जनजीवन विस्कळीत PHOTO

Solapur Shocking: माझ्या अंगावर गाडी का घातली? बस थांबवत पैलवानानं एसटी चालकाची गचांडी पकडली | Video Viral

SCROLL FOR NEXT