Sunflower 2 Trailer Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sunflower 2 मध्ये उलगडणार 'त्या' खुनाचा मास्टरमाईंड; कॉमेडी सीरीजमध्ये 'या' अभिनेत्रीची एन्ट्री

Sunflower 2 Trailer Out: अभिनेता कॉमेडियन सुनील ग्रोवरच्या मोस्ट अवेटेड 'सनफ्लॉवर' वेबसीरीजच्या सिक्वेलचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Chetan Bodke

Sunflower 2 Trailer

अभिनेता कॉमेडियन सुनील ग्रोवरच्या 'सनफ्लॉवर' वेबसीरीजचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या मोस्ट अवेटेड वेबसीरीजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये कायमच प्रेक्षकांचा निखळ मनोरंजन करणारा सुनील आता ओटीटी मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेत्यासोबत अभिनेत्री अदा शर्मा सुद्धा दिसणार आहे. अदा शर्माच्या भूमिकेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या वेबसीरीजमध्ये सुनिल ग्रोवरबरोबर अदा स्क्रिन शेअर करतेय. (Bollywood)

शेअर केलेल्या ट्रेलरमध्ये, एक खून झालेला असतो. त्या खूनाचा आरोपी 'सनफ्लॉवर' सोसायटीमध्ये असतो. त्या सोसायटीमध्ये असलेल्या आरोपीला पोलिस कशाप्रकारे पकडतात ?, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला वेबसीरीजमध्ये मिळेल. सुनील ग्रोव्हर सह इतर सोसायटीतील सदस्य पोलिसांना गोंधळात टाकण्यासाठी काय काय पाऊलं उचलतात, आपल्याला वेबसीरीज पाहिल्यावरच कळेल. अदा शर्मा 'सनफ्लॉवर'च्या सिक्वेलमध्ये नव्याने आली असून तिच्या येण्याने कथेमध्ये एक ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. तिच्या एन्ट्रीने वेबसीरीजची कथा आणखीनच इंटरेस्टिंग होणार आहे. (Web Series)

या वेबसीरीजमध्ये अदाची खूपच वेगळी भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. वेबसीरीजमध्ये सुनील ग्रोव्हरने सोनूचे पात्र साकारले आहे. तर अदा शर्माने वेबसीरीजमध्ये रोझी मेहताचे पात्र साकारले. रोझी मेहताच्या येण्याने पोलिसांना मारेकरी पकडण्याचा अवघड खेळ सुरू होतो. (OTT)

खुनी कोण आहे हे शोधणे अशक्य वाटते, पण पोलीस (रणवीर शौरी) आपल्या कौशल्याच्या जोरावर चोराला पकडतात. तुम्ही Zee5 या ओटीटी प्लटफॉर्मवर 'सनफ्लॉवर'चा सिक्वेल पाहू शकणार आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून अनेक स्टार कास्टने ओटीटी क्षेत्रात पदार्पण केले. १ मार्च २०२४ रोजी रिलीज होणार आहे. (Bollywood News)

२०२१ मध्ये 'सनफ्लॉवर' सीरिजचा पहिला भाग रिलीज झाला होता. या सीरीजचे दिग्दर्शक विकास पहल असून सह-दिग्दर्शक राहुल सेनगुप्ता आहेत. या वेबसीरीजमध्ये प्रमुख भूमिकेत सुनील ग्रोव्हर, अदा शर्मा, रणवीर शौरी, गिरीश कुलकर्णी, मुकुल चड्ढा, सोनाली नागराणी, सोनल झा आणि आशिष विद्यार्थी यांचा समावेश आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT