Scam 2003 Part 2 Trailer Saam Tv
मनोरंजन बातम्या

Scam 2003 Part 2 Trailer: 'मुंबई का किंग कौन?', 'स्कॅम 2003 पार्ट 2' चा ट्विस्टनं भरलेला ट्रेलर आऊट; तेलगी घोटाळा डोळ्यांसमोर येणार

Telgi Scam: या वेबसीरिजमध्ये अब्दुल करीम तेलगीची (abdul karim telgi) कथा दाखवण्यात येणार आहे.

Priya More

Scam 2003 The Telgi Story:

चित्रपट निर्माते हंसल मेहता आणि तुषार हिरानंदानी यांनी 'स्कॅम 1992'मधून ओटीटीच्या जगात प्रवेश केला होता. या वेबसीरिजच्या माध्यमातून त्यांनी खळबळ उडवून दिली.या वेबसीरिजच्या माध्यमातून त्यांनी हर्षद मेहताची कथा दाखवली होती. आता पुन्हा एकदा ही जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी 'स्कॅम 2003' (Scam 2003: The Telgi Story) ही नवी वेबसीरिज घेऊन आली आहे.

'स्कॅम 2003' या वेबसीरिजचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अब्दुल करीम तेलगीची (abdul karim telgi) कथा दाखवण्यात येणार आहे. या सीरिजमध्ये तेलगीने गेम कसा खेळला हे दाखवले जाईल.

नुकताच हंसल मेहता यांनी या वेब सीरिजचा धमाकेदार ट्रेलर रिलीज केला. तसंच या माध्यमातून त्यांनी वेबसीरिजची रिलीज डेट देखील जाहीर केली आहे. 'स्कॅम 2003'चा दुसरा सीझन येत्या ३ नोव्हेंबरपासून सोनी लिव्ह अॅपवर प्रसारित केला जाईल. 'स्कॅम 2003'च्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. पहिल्या सीझनच्या ट्रेलरमध्ये दिसल्याप्रमाणे तो रोमांचक आणि ट्विस्टने भरलेला आहे.

हंसल मेहताच्या 'स्कॅम 2003: द तेलगी स्टोरी' या हिट वेब सीरिजच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर बुधवारी म्हणजेच 18 ऑक्टोबर रोजी रिलीज करण्यात आला. कर्नाटकातील मध्यमवर्गीय कुटुंबातील अब्दुल करिब तेलगी यांना वडिलांच्या निधनानंतर आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. त्याने कसा तरी अभ्यास पूर्ण केला आणि मग फळे विकायला सुरुवात केली. कर्नाटकातील खानापूर येथे जन्मलेल्या अब्दुल करीम तेलगी या घोटाळेबाजाचा प्रवास कसा सुरू होतो आणि या खेळात कोण कोण सहभागी आहे? याचा सूत्रधार कोण आहे? हे या सीरिजमधून दाखवण्यात येणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'स्कॅम 2003'ची कहाणी अब्दुल करीम तेलगीची आहे. ज्याने 30 हजार कोटी रुपयांचा स्टॅम्प पेपर घोटाळा केला होता.एवढेच नाही तर त्याने 18 राज्य, संपूर्ण देश हादरवून सोडला आणि देशाच्या पंतप्रधानांची झोप उडवून टाकली. आता हे रहस्य नव्या एपिसोडमध्ये उलगडणार आहे. ही मालिका संजय सिंग लिखित 'तेलगी: अ रिपोर्टर्स डायरी' या पुस्तकावर आधारित आहे. कसा तरी अभ्यास पूर्ण केला आणि मग फळे विकायला सुरुवात केली. अब्दुल करीम तेलगीने गरिबीच्या पाशातून बाहेर येऊन हजारो कोटी रुपयांचा स्टॅम्प पेपर घोटाळा कसा केला आणि भरपूर पैसे कसे छापले हे या वेबसीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहे.

दरम्यान, या घोटाळ्यानंतर आरोपी तेलगीला 2001 मध्ये अजमेरमध्ये अटक करण्यात आली होती. त्याला 30 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय त्याला 202 कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दरम्यान, 23 ऑक्टोबर 2017 रोजी तेलगीच्या मृत्यूची बातमी समोर आली होती. त्याला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे सांगण्यात येत आहे.

या वेब सीरीजचे दिग्दर्शन हंसल मेहता आणि तुषार हिरानंदानी यांनी केलं आहे. 3 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या वेब सिरीजमध्ये गगन देव रियार, सना अमीन शेख, भावना बलसेवार, भरत जाधव, जे. डी.चक्रवर्ती, भरत दाभोळकर, शशांक केतकर, तलत अजीज, निखिल रत्नपारखी, विवेक मिश्रा, हिता चंद्रशेखर, अजय जाधव, दिनेश लाल यादव हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

Chandra Grahan Tips : ग्रहणाच्या वेळी अन्न दूषित होऊ नये यासाठी सोपा उपाय

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

SCROLL FOR NEXT