War 2 VS Coolie SAAM TV
मनोरंजन बातम्या

War 2 VS Coolie : हृतिक रोशन अन् रजनीकांत यांच्यात कांटे की टक्कर, पहिल्या दिवशी कोणी मारली बाजी?

War 2 VS Coolie Box Office Collection Day 1 : बॉक्स ऑफिसवर 'वॉर 2' आणि 'कुली' चित्रपटाची तगडी टक्कर पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवशी कोणत्या चित्रपटाने छप्परफाड कमाई केली, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'वॉर 2' आणि 'कुली' दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

'वॉर 2' आणि 'कुली' 14 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

'वॉर 2' हा हृतिक रोशन तर 'कुली' साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांचा चित्रपट आहे.

सध्या बॉक्स ऑफिसवर 'वॉर 2' (War 2) आणि 'कुली' (Coolie ) दोन्ही चित्रपट धुमाकूळ घालत आहे. प्रेक्षक दोन्ही चित्रपटांची उत्सुकतेने वाट पाहत होते. 'वॉर 2' आणि 'कुली' चित्रपट काल (14 ऑगस्ट)ला रिलीज करण्यात आला आहे. बॉक्स ऑफिसवर 'वॉर 2' आणि 'कुली' मध्ये तगडी टक्कर पाहायला मिळत आहे. चित्रपटांचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊया.

'वॉर 2' चित्रपट

'वॉर 2' चित्रपटात दोन सुपरस्टार आमने सामाने पाहायला मिळत आहे. साऊथचा सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर (Junior ntr) आणि बॉलिवूडचा स्टार अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) झळकले आहेत.'वॉर 2' हा एक ॲक्शन चित्रपट आहे. चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी ( Kiara Advani ) देखील आहे. ज्युनियर एनटीआर आणि हृतिक रोशनचा ॲक्शन मोड आणि कियारा अडवाणीचा ग्लॅमरस लूकने चित्रपटाला चारचाँद लावले आहे. 'वॉर 2' हा चित्रपट टायगर श्रॉफ आणि हृतिक रोशन यांच्या 2019 साली रिलीज झालेल्या 'वॉर' चा सिक्वेल आहे. चित्रपट सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केला आहे.

'वॉर 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 1

'वॉर 2' या स्पाय-अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटाने पहिल्या दिवशी बंपर कमाई केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'वॉर 2' चित्रटाने ओपनिंग डे ला 52.50 कोटींचा व्यवसाय केला आहे. त्यामुळे भविष्यात हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरचा 'वॉर 2' रजनीकांत यांच्या 'कुली' चित्रपटाला तगडी टक्कर देणार आहे.

'कुली' चित्रपट

रजनीकांत (Rajinikanth ) यांच्या 'कुली' चित्रपटात तगडे कलाकार पाहायला मिळत आहे. चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबत आमिर खान, नागार्जुन अक्किनेनी, श्रुती हसन आणि सत्यराज असे अनेक मोठे कलाकार झळकले आहेत. 'कुली' मध्ये रजनीकांत हे मुख्य भूमिकेत आहे. 'कुली'मधील आमिर खानचा कॅमिओ पाहायल मिळत आहे.'कुली' चित्रपट तमिळ, हिंदी, तेलुगु आणि कन्नड या भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराज यांनी केले आहे.

'कुली' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 1

मीडिया रिपोर्टनुसार, 'कुली'ने पहिल्या दिवशी भारतात अंदाजे 65 कोटी रुपये कमावले आहेत. परदेशात 75 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाचे जगभरातील कलेक्शन सुमारे 140 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी रजनीकांत यांच्या 'कुली' चित्रपटाने हृतिक रोशनच्या 'वॉर 2' ला मागे टाकले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Janmashtami 2025 : लाडक्या कान्हाला '५६ भोग' असा नैवेद्यच का अर्पण केला जातो?

Child Birth Rate : लोकसंख्या वाढीसाठी 'या' देशाचा मोठा निर्णय; मुलाच्या जन्मासाठी मिळणार तब्बल ६ लाख रुपये

Maharashtra Live Update: मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Latur Tourism : विकेंड गेटवे! लातूरमधील किल्ले, मंदिरे आणि निसर्गरम्य ठिकाणं तुमची वाट पाहतायेत, लगेचच द्या भेट

Chetana Bhat: असं रुप पाहिलं अन् मन गहिरवरुन आलं...

SCROLL FOR NEXT