War 2 Public Review: ऋतिक रोशन, ज्युनियर एनटीआर आणि कियारा अडवाणी यांचा 'वॉर २' हा चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटाबद्दल बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे आणि आता हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, त्यामुळे चित्रपट पाहिल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत. म्हणून जर तुम्हीही हा चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल तर सोशल मीडिया रिव्ह्यू नक्की वाचा.
ट्विटर प्रतिक्रिया
'वॉर २'बद्दल एकाने लिहिले, 'मी अवाक आहे. 'वॉर २' हा चित्रपट किती चांगला आहे, शेवटपर्यंत अॅक्शनने भरलेला आहे. हृतिक रोशनची अॅक्शन आणि ज्युनियर एनटीआरची स्टाईल या चित्रपटात चारचांद लावतो. आणखी एकाने लिहिले, 'मला खूप काही सांगायचे आहे, पण मी स्पॉयलर देऊ इच्छित नाही. हा यशराज फिल्म्सचा सर्वोत्तम स्पाय युनिव्हर्स चित्रपट आहे ज्यामध्ये नॉनस्टॉप अॅक्शन आहे. तुम्हाला तो फक्त थिएटरमध्ये पाहण्याचा आनंद मिळेल.
वॉर २
२०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या वॉर या चित्रपटातचा पुढचा भाग वॉर २ आहे. यामध्ये हृतिक रोशन कबीर ही भूमिका साकारणार आहे. वॉर २ मध्ये आशुतोष राणा देखील आहेत. या चित्रपटाद्वारे तिन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. ज्युनियर एनटीआरचा हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
वॉर २ हा चित्रपट रजनीकांतच्या कुली चित्रपटाशी बॉक्स ऑफिसवर स्पर्धा करत आहे. दोन्ही चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाले आहेत, आता पहावे लागेल की या पैकी कोणता बॉक्स ऑफिसवर बाजी मारतो.