Vivek Oberoi-Aishwarya Rai Breakup Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vivek Oberoi-Aishwarya Rai: ऐश्वर्यासाठी विवेक सलमानशीही नडला; मात्र ब्रेकअपनंतर एकाकी पडला

'कॉफी विथ कारण' या कार्यक्रमात विवेकने केलेल्या वक्तव्याचा त्याला आजही पश्चाताप होत आहे.

Pooja Dange

Vivek Oberoi-Aishwarya Rai Breakup: बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेते यांच्या रिलेशनची नेहमीच चर्चा होते. खूप वर्षांपूर्वी संपलेली नाती सुद्धा कोणत्या न कोणत्या कारणाने समोर येतात. बॉलिवूडमधील जोडीची चर्चा नेहमीच होत असते ती म्हणजे विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय यांची. विवेकला एक मुलाखतीदरम्यान यावर प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा विवेकने यावर बोलण्यास नकार दिला होता. लोक त्याच्या या मुलाखतीची अजूनही चर्च करत आहे.

विवेक ओबेरॉय याने जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते तेव्हा हा नेक्स्ट सुपरस्टार आहे अशी चर्चा झाली होती. परंतु विवेकच्या आयुष्यात ऐश्वर्या रायची एन्ट्री झाली. त्यानंतर जे झाले ते तुम्हाला माहितच असेल. २००३ साली झालेल्या एका मुलाखतीमध्ये विवेक ओबेरॉय याने सलमान खानविषयी अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. (Bollywood)

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याविषयी माहित नसेल असे फार कमी लोक असतील. ऐश्वर्यामुळे सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्यात वैर निर्माण झाले. विवेकने केलेल्या वक्तव्यामुळे सलमानने अजून त्याला माफ केलेले नाही. विवेकने बऱ्याचदा त्यांच्यातील वाद सोडविण्याचा प्रयत्न केला होता. करण जोहरने विवेकला विचारले होते की, तू ऐश्वर्याला कुठल्या इंडस्ट्रीमध्ये बघतोस हॉलिवूड की बॉलिवूड? तेव्हा विवेक ओबेरॉयने उत्तर दिले, ऐश्वर्याला मी माझ्या मिठीत बघतो. (Celebrity)

'कॉफी विथ कारण' या कार्यक्रमात विवेकने केलेल्या वक्तव्याचा त्याला आजही पश्चाताप होत आहे. या वक्तव्यानंतर विवेकची सर्वत्र चर्च होत होती. त्यानंतर विवेक आणि ऐश्वर्या यांचे नाते तुटले. पण सलमान आणि विवेक यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली. विवेक आणि ऐश्वर्याच्या नात्याच्या चर्चा होण्याआधी थोड्या दिवसांपूर्वीच सलमान आणि ऐश्वर्या यांच्यात दुरावा आला होता. (Aishwarya Rai)

२००३ मध्ये विवेक ओबेरॉय याने प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. यावेळी विवेकने सांगितले होते की सलमानने त्याला दारू पिऊन कॉल केला होता. तसेच सलमानने त्याला धमकी सुद्धा दिली होती. सलमान विवेकला म्हणाला होता की तो विवेकाचे करिअर संपवेल. सलमानने एका रात्रीत त्याला ४१ वेळा कॉल केला होता. विवेकने सलमान खानचे मेसेज सूयुद्ध मीडियाला दाखविले होते ज्यामध्ये सलमानने विवेकला मारहाण कार्यालयाची आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती. विवेकने सुद्धा सलमानला सुनावले होते.

विवेकला वाटले होते की ऐश्वर्या रे त्याला सपोर्ट करेल, परंतु असे काहीच घडले नाही. उलट या घटनेनंतर ऐश्वर्या विवेकपासून लांब गेली. विवेकने एका चॅट शोमध्ये याबाबत खंत व्यक्त केली होती. विवेकला त्याची चूक समजली नई त्याने सलमानची माफी सुद्धा मागितली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : झेडपी निवडणुकांचं बिगुल आज वाजणार!

Election 2026: नालासोपाऱ्यात १० लाखांची रोकड पकडली, भाजपकडून पैसे वाटल्याचा आरोप; VIDEO समोर

Crime News : ताम्हिणी घाटात घडला रक्तरंजित थरार; मित्रानेच घेतला मित्राचा जीव, धक्कादायक कारण आले समोर

Dress Designs: डेली वेअरसाठी हे आहेत 5 ट्रेडिंग ड्रेस पॅटर्न, नक्की ट्राय करा

Vitamin B12च्या कमतरेचं कारण काय? या ३ चुका आत्ताच टाळा, अन्यथा...

SCROLL FOR NEXT