Tollywood Director  Twitter/ @vivekagnihotri
मनोरंजन बातम्या

Tollywood: बहुचर्चित चित्रपटांचे दिग्दर्शक एकत्र येत करणार नवा प्रयोग, कलाकृतीची ट्विटरवर चर्चा

आता 'द काश्मिर फाईल्स' आणि 'पुष्पा: द राईज' चे दिग्दर्शक एकत्र येत प्रेक्षकांसाठी एक दर्जेदार कलाकृती घेऊन येण्याची शक्यता आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

'द काश्मिर फाईल्स' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक कोटींचा गल्ला जमवला आहे. सोबतच चित्रपट ऑस्करमध्ये बाजी मारणार ही देखील सर्वत्र चर्चा होती. पण या चित्रपटाची ऑस्करवारी हुकली. २०२२च्या सर्वात चर्चित चित्रपटांमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.

१९९० मध्ये काश्मिरी पंडितांनी सहन केलेला अन्याय आणि त्यावेळी घडलेली कथा चित्रपटात चित्रित करण्यात आली आहे. विवेक अग्निहोत्री सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. त्यांची नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे.

समाजात घडत असणाऱ्या अनेक मुद्द्यांवर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सध्या बॉलिवूडमधील सर्वाधिक गहण प्रश्न आहे तो, बॉयकॉटचा. अनेक चित्रपटांना बॉयकॉटच्या ट्रेंडला बळी पडावे लागले आहे. बॉयकॉटच्या मुद्द्यावरून त्यांनी अनेकदा बॉलिवूड कलाकारांवर टिकास्त्र सोडले होते. काही दिवसांपुर्वी त्यांच्या आगामी चित्रपटाची ही चर्चा सुरु होती. अशातच त्यांनी आपल्या चाहत्यांना एक मोठे गिफ्ट दिले आहे.

यावर्षात अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत. यामध्ये आघाडीवर दाक्षिणात्य चित्रपटांची वर्णी होती. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे, 'पुष्पा: द राईज' चित्रपटात रश्मिका मंदाना आणि अल्लु अर्जुन यांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपटाने बरीच हॅट्रिक मारली. आता 'द काश्मिर फाईल्स' आणि 'पुष्पा: द राईज' चे दिग्दर्शक एकत्र येत प्रेक्षकांसाठी एक दर्जेदार कलाकृती घेऊन येण्याची शक्यता आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी केलेल्या एका ट्विटमुळे बरेच चर्चेत आले आहे. विवेक अग्निहोत्री यांनी ‘पुष्पा’चे दिग्दर्शक सुकुमार आणि ‘द काश्मीर फाइल्स’चे निर्माते अभिषेक अग्रवाल यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्या पोस्टमध्ये हे तिघे लवकरच एकत्र काम करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

त्यांनी लिहिले, “चित्रपटाच्या माध्यमातून भारताला एकत्र आणत आहोत. अधिक माहिती लवकरच कळेल. ओळखा पाहू? सुकुमार (दिग्दर्शक, #पुष्पा) + अभिषेक अग्रवाल (निर्माते, #द काश्मीर फाईल्स) + युअर्स ट्रूली (#द काश्मीर फाईल्स)”

यांच्या नव्या चित्रपटाची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. चाहते नव्या चित्रपटासाठी बरेच उत्सुक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: पैसा टिकत नाहीये? चाणक्यांचे हे ६ नियम बदलू शकतात तुमचं आर्थिक आयुष्य

Torrent Power Karjat Project: विरोधकांचे फेक नरेटिव्ह; कर्जतचा प्रकल्पातील वृक्षतोडीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra News Live Update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात ११वा आरोपी अटकेत; प्रांजल ठकरानला ६ दिवसांची पोलीस कोठडी

Vaidehi Parshurami: फुलांनी सजली वैदेही परशुरामी! अभिनेत्रीच्या खास फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

Chakli Recipe : दिवाळीत कुरकुरीत चकली करायची? भाजणीचीही गरज नाही अन् वेळही वाचणार, फक्त फॉलो करा ही रेसिपी

SCROLL FOR NEXT