Vivek Agnihotri On Tweet On Kashmiri Pandit  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vivek Agnihotri On Manipur Files : मणिपूर फाइल्स सिनेमा करा; नेटकऱ्याच्या कॉमेंटला विवेक अग्निहोत्रींचं सडेतोड उत्तर

Pooja Dange

Vivek Agnihotri Respond To Netizens Tweet : दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री त्यांच्या 'द काश्मीर फाईल्स अनरिपोर्टेड' या वेबसीरीजमुळे चर्चेत आहेत. नुकताच या वेबसीरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 'द काश्मीर फाईल्स अनरिपोर्टेड' लवकरच झी५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.

'द काश्मीर फाईल्स'च्या यशानंतर आणि चित्रपटावर करण्यात आलेल्या टीकेनंतर दिग्दर्शकांनी 'द काश्मीर फाईल्स अनरिपोर्टेड' बनविण्याचा निर्णय दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी घेतला. (Latest Entertainent News)

नुकतेच विवेक अग्निहोत्री यांनी काश्मिरी पंडितांच्या हत्येबाबत एक ट्विट शेअर केले होते. त्यावर ट्विटर युजरने दिग्दर्शकांना 'मणिपूर फाईल्स'वर चित्रपट बनवण्यास सांगितले आहे.

विवेक अग्निहोत्रीला बनवणार 'मणिपूर फाइल्स'

ट्विटरवर एका नेटकाऱ्याने विवेक अग्निहोत्रीला यांना सांगितले की, "वेळ वाया घालवू नका आणि जर तुम्ही खरे मर्द असाल तर 'मणिपूर फाइल्स' चित्रपट बनवायला घ्या."

यावर, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी उत्तर दिले, "माझ्यावर इतका विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद. पण सगळे चित्रपट तुम्हाला माझ्याकडूनच का बनवायचे आहेत मित्र ? तुझ्या 'टीम इंडिया'मध्ये कोणी मर्द फिल्ममेकर नाही का?'

मणिपूरमध्ये काय झाले?

19 जुलै रोजी, मणिपूर हिंसाचाराचा एक जुना व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला . यात एका समुदायातील दोन महिलांना दुसऱ्या समुदायातील काही पुरुषांनी नग्न करून परेड करताना दाखविण्यात आले आहे. ही कथित घटना 4 मे रोजी कांगपोकपी जिल्ह्यात घडली , ज्याच्या एका दिवसानंतर उत्तर-पूर्व राज्यात हिंसाचार सुरू झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT