Javed Akhtar On virat kohli Saam Tv
मनोरंजन बातम्या

Javed Akhtar: 'त्याच्यात खूप क्रिकेट...; विराटच्या कसोटीतून निवृत्तीमुळे जावेद अख्तर निराश,म्हणाले- पुन्हा विचार...

Javed Akhtar On virat kohli: विराट कोहलीने कसोटी सामन्यामधून निवृत्तीची घोषणा करत सगळ्यांना धक्का दिला आहे, त्याच्या या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये आणि क्रिकेटप्रेमींमध्ये निराशा पसरली आहे.

Shruti Vilas Kadam

Javed Akhtar On virat kohli: भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने १२३ टेस्ट सामन्यांमध्ये ९,२३० धावा करताना ३० शतके आणि ३१ अर्धशतके झळकावली आहेत. परंतु, अचानक विराटने कसोटी सामन्यामधून निवृत्तीची घोषणा करत सगळ्यांना धक्का दिला आहे, त्याच्या या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये आणि क्रिकेटप्रेमींमध्ये निराशा पसरली आहे. तसेच ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी देखील त्याला निवृत्ती घेण्याबद्दल पुन्हा विचार करण्याचा सल्ला दिला आहे.

प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी लिहिले, "जाहिर आहे की विराटला स्वतःबद्दल अधिक माहिती आहे, पण एक चाहत्याच्या नात्याने मी त्याच्या टेस्ट क्रिकेटमधून वेळेपूर्वी निवृत्ती घेण्याच्या निर्णयाने निराश झालो आहे. मला वाटते की त्यांच्यात अजूनही खूप क्रिकेट बाकी आहे. मी त्याला विनंती करतो की त्याने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा."

कोहलीच्या निवृत्तीच्या निर्णयावर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही चाहते त्याच्या निर्णयाचा आदर करत आहेत, तर काहींनी त्याला पुन्हा विचार करण्याची विनंती केली आहे. एक यूजरने लिहिले, "विराट कोहलीसारख्या दिग्गजाला माहित आहे की कधी निवृत्त व्हावे. त्याच्या निर्णयाचा आदर करूया." तर दुसऱ्या यूजरने लिहिले, "मला देखील वाटते की त्याने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा."

विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, तो त्याच्या पत्नी अनुष्का शर्मासोबत वृंदावन येथील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात गेला आहे. या भेटीदरम्यान, त्याने अध्यात्मिक चर्चा केली आणि शांतता अनुभवली. या भेटीने त्याच्या निवृत्तीच्या निर्णयामागील संभाव्य कारणांबद्दल चर्चेला उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बीड येथे डिझेलच्या टँकरचा अपघात झाल्याने धुळे सोलापूर महामार्गावरील बसाना पाली जवळ मोठी गर्दी

पोलीस निरीक्षक १ लाखांची लाच घेताला रंगेहाथ सापडला; पोलीस विभागात उडाली खळबळ

Methi Zunka Recipe: मेथीची भाजी खाऊन कंटाळा आलाय तर झटपट बनवा मेथीचा झुणका, सोपी आहे रेसिपी

नागपूरमध्ये आमदारांना धमक्यांचं सत्र; खोपडेंनंतर राऊतांना जीवे मारण्याची धमकी|VIDEO

Maharashtra Tourism: बोरीवलीपासून अवघ्या ३ तासांच्या अंतरावर आहे हे हिल स्टेशन; या विकेंडला स्वस्तात मस्त प्लॅन करा

SCROLL FOR NEXT