Chakda Xpress News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Chakda Xpress: चित्रपटातील मेहनत पाहून भावूक झाला विराट; म्हणाला अनुष्काचा मला ...

अनुष्का शर्मा आगामी चित्रपट 'चकडा एक्सप्रेस'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma)आणि क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) हे लोकप्रिय कपल नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा हे कपल एकमेकांसोबतचे खास क्षण सोशल मीडियावर शेअर करत असतात. सध्या या जोडीची चर्चा सर्वत्र रंगली आहे. अनुष्का तिच्या आगामी 'चकडा एक्सप्रेस' या चित्रपटामध्ये व्यग्र आहे. चित्रपटाची तिची मेहनत पाहून पती विराट कोहली देखील चक्रावून गेला आहे.

'चकडा एक्सप्रेस' चित्रपट भारतीय महिला क्रिकेटर झुलन गोस्वामीचा बायोपिक आहे. चित्रपटात अनुष्का झुलन गोस्वामीच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. अलिकडेच चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे. चित्रपटाचा टिझरपाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये विराट कोहलीने पत्नी अनुष्काबद्दल झुलन गोस्वामीची भूमिका पडद्यावर साकारण्यासाठी खूप मेहनत घेत असल्याचे म्हटले आहे.

विराट पुढे म्हणाला, 'माझ्यासाठी चित्रपटाचा अर्थ फक्त ३ तास तो बघण्यापुरता मर्यादित होता. मात्र मी अनुष्काला चित्रपटासाठी प्रशिक्षण घेताना पाहिले. आणि चित्रपट काय असतो हे मला समजले. अनुष्का तिच्या लूक आणि कामाबद्दल खूप परफेक्ट आहे. ही तेजस्वी कामगिरी ती पहिल्यांदाच करत आहे'.

अनुष्का शर्मा आगामी चित्रपट 'चकडा एक्सप्रेस'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. अनुष्का लंडनमध्ये एकटी असून पती विराटला मिस करत आहे. अलीकडेच पती विराटसोबतचा एक फोटो शेअर करत तिने मिस यू असे म्हटलं होते. यासह तिने 'जग अधिक उजळ, मनोरंजक आणि मजेदार दिसतं जेव्हा तुम्ही एका खास व्यक्तीसह हॉटेल बायो-बबलमध्ये असतात' असंही लिहिले होते.

दिग्दर्शक प्रोसित रॉय 'चकडा एक्स्प्रेस'चे दिग्दर्शन करत असून, कर्णेश या चित्रपटाचा निर्माता आहे. त्याचबरोबर अभिषेक बॅनर्जीने चित्रपटाचे लेखन केले आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. अनुष्का शर्मा ४ वर्षांनंतर 'चकडा एक्सप्रेस'मधून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. अनुष्का शेवटची २०१८ मध्ये 'झिरो'या चित्रपटात दिसली होती.

Edited By- Manasvi Choudhary

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अमित ठकरेंनी घेतली आशिष शेलार यांची भेट, नेमकं 'राज'कारण काय?

NCDC Recruitment: NCDC मध्ये सरकारी नोकरीची संधी; पगार मिळणार २०८७०० रुपये; अर्ज कसा करावा?

Water Drinking Rules: चाळिशीतही चेहऱ्यावर ग्लो हवाय? मग पाणी पिण्याच्या 'या' चूका टाळाच

Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावर मुंबईच्या सराफा व्यापाऱ्याला लुटले, साडेचार किलो सोने आणि रोकड लंपास

बैलपोळा सणाला काळाचा घाला; ६ वर्षीय चिमुकल्याचा नाल्यात पडून मृत्यू, खाटेवरून मृतदेह गावात आणला

SCROLL FOR NEXT