Deepika-Ranveer Viral Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Deepika-Ranveer Video: ‘मला विचारा...’; रणबीर- दीपिकाच्या घटस्फोटाच्या चर्चेदरम्यानच नवा व्हिडिओ आला समोर

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. सध्या त्यांचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

Chetan Bodke

Deepika-Ranveer Viral Video: बॉलिवूडच क्यूट कपल अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग हे कपल नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतं. त्यांची नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चा होत राहते. सध्या यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चागंलाच व्हायरल होत आहे.

रणवीर आणि दीपिकाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. दीपिका रणवीरला इग्नोर करताना दिसली होती. त्यानंतर एक नवा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत, “कहते हैं अगर किसी चीज को शिद्दत से चाहो; तो पुरी कायनात उसे तुमसे मिलने की कोशिश में लग जाती है” हा डायलॉग ‘ओम शांती ओम’या चित्रपटातील आहे. याला उत्तर देत रणवीर म्हणतो, ‘राम-लीला’मधील स्टाइलमध्ये “मला विचारा.. मी याची खात्री देऊ शकतो.” असं म्हटलं आहे.

‘इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स २०२३’ या कार्यक्रमामध्ये दीपिका व रणवीर यांनी एकत्र हजेरी लावली होती. यावेळी कार्यक्रमाला दीपिकाचे वडील प्रकाश पादुकोण यांनीही उपस्थिती लावली होती. दरम्यान दीपिकाच्या एका कृतीने सगळ्यांचं लक्षं वेधलं आहे. दीपिका आणि रणवीर रेड कार्पेटच्या दिशेने चालत येत होते. यावेळी रणवीरने एकत्र जाण्यासाठी दीपिकाला हात दिला.

पण रणवीरच्या कृत्याकडे दीपिकाने दुर्लक्ष केले. ती त्या वेळी तिच्या वडिलांसोबत पुढे निघून गेली. दीपिकाच्या या वागण्यामुळे सोशल मीडियावर यांच्या नात्याबद्दल बरीच चर्चा सुरु झाली आहे. पण त्यांच्या व्हिडीओमुळे दोघांच्या नात्यात सर्व आलबेल असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे दोघांमध्ये बिनसल्याची चर्चा निव्वळ अफवा आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

Sushil Kedia: ठाकरेंची माफी मागून केडियानं पुन्हा पलटी मारली; म्हणाला 'काय बोललो याचा पश्चाताप नाही'

SCROLL FOR NEXT