Cirkus Official Trailer  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Cirkus Trailer: मनोरंजनाचा डबल धमाका करणाऱ्या 'सर्कस'चा ट्रेलर प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा चाहतावर्ग त्याच्या अभिनयाला सर्वाधिक पसंदी दर्शवतात. नेहमीच त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक आतूरतेने वाट पाहत असतात.

Chetan Bodke

Cirkus Official Trailer: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा चाहतावर्ग त्याच्या अभिनयाला सर्वाधिक पसंदी दर्शवतात. नेहमीच त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक आतूरतेने वाट पाहत असतात. रणवीर लवकरच त्याचा आगामी चित्रपट 'सर्कस'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणवीर त्याच्या नव्या लूकसोबतच चाहत्यांचे अनोख्या पद्धतीने मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

यंदाचा मोस्ट अवेटेड 'सर्कस' चित्रपटाबद्दल बोलायचे तर, रणवीर सिंगची वेगळी स्टाइल यात पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात दीपिकाने तिच्या डान्स परफॉर्मन्सने चाहत्यांची उत्कंठा आणखीनच शिगेला पोहोचवली आहे. चित्रपटाचा ट्रेलर विनोदी आणि मजेदार संवादांनी परिपूर्ण असा आहे. हे अनोखे मनोरंजन पाहण्याची संधी चाहत्यांना लवकरच मिळणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

काही दिवसांपूर्वीच रणवीरच्या 'सर्कस' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. सोशल मीडियावर त्याला बरीच पसंती दर्शवण्यात आली आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे, टीझरप्रमाणेच ट्रेलरमध्येही चित्रपटाच्या संपूर्ण कलाकारांना पाहण्याची संधी मिळाली आहे. हा धमाकेदार ट्रेलर चाहत्यांची मनं जिंकत आहे. यासोबतच दीपिका पदुकोणने तिच्या अदांनी सर्वांनाच चकित केले आहे. या चित्रपटात रणवीरसोबत जॅकलिन फर्नांडिस आणि पूजा हेगडे यांच्याही प्रमूख भूमिका आहेत.

या चित्रपटात प्रेक्षकांना रणवीर सिंगचा भव्य अनुभव पाहण्याची संधी मिळणार आहे. या चित्रपटात एक नाही तर दोन रणवीर सिंग चाहत्यांना पाहता येणार आहे, म्हणजेच चित्रपटात मनोरंजनाचा डबल धमाका. ट्रेलरमधील परफेक्ट कॉमेडी टायमिंग आणि गंमतीदार शब्द तुम्हाला हा ट्रेलर पाहण्यास भाग पाडणार आहे.

जॅकलीन आणि पूजा हेगडे यांनी देखील आपल्या पात्रांनी प्रेक्षकांचे मने जिंकले आहेत. ट्रेलरमध्ये रणवीरचा मनोरंजनाचा धमाका सर्वत्रच दिसत आहे. पण दीपिकाच्या एन्ट्रीने प्रेक्षकांना चांगलाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. दीपिकाने आपल्या एन्ट्रीवर चाहत्यांना शिट्टी वाजवायला भाग पाडणार हे नक्की. मोठ्या पडद्यावर चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी रणवीर-दीपिका पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत.

रोहित शेट्टी त्याच्या धमाकेदार चित्रपटांसाठी ओळखला जातो. अशा परिस्थितीत चाहत्यांना त्याच्या चित्रपटाकडून खूप आशा आहेत. त्याचे चित्रपट अनेकदा बॉक्स ऑफिसवर बराच धमाका करतात. यावेळी रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सर्कस'प्रेक्षकांचे किती मनोरंजन करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Raj & Uddhav Thackeray: ठाकरे बंधूंचा नवा टीझर; मराठी अस्मितेचा बुलंद आवाज पुन्हा दुमदुमला|VIDEO

Devshayani Ekadashi: देवशयनी एकादशीचं काय आहे महत्त्वं? जाणून घ्या पूजेची योग्य वेळ

Satara Crime : घरकाम करणाऱ्या महिलेने मारला डल्ला; दहा तोळे सोने लांबवीले, महिलेला पोलिसांनी केली अटक

Asteroid Scare : कुतुबमिनारपेक्षा ९ पट मोठा लघुग्रह पृथ्वीवर धडकणार | VIDEO

SCROLL FOR NEXT