Virajas Kulkarni And Ghost Saam Tv
मनोरंजन बातम्या

विराजस कुलकर्णीला पुण्यातील रस्त्यावर दिसले भूत! Video शेअर करत सांगितला भयानक अनुभव

अभिनेता विराजस कुलकर्णी याला पुण्यातील एका रस्त्यावर मध्यरात्री भूत दिसले आहे. हा अनुभव विराजसने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: अभिनेत्री म्रीणाल कुलकर्णीचा मुलगा आणि अभिनेता विराजस कुलकर्णी याला पुण्यातील एका रस्त्यावर मध्यरात्री भूत दिसले आहे. हा अनुभव विराजसने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सध्या विराजसचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. विराजसने त्याचा व्हिडिओ इनस्टावर पोस्ट केला आहे. यामध्ये तो सांगत आहे की, एक खूप रात्री माझे नाटकाचे काम आटपून मी आणि माझा मित्र बाइकवरून घरी सोडत होता. मित्र बाइक चालवत होता आणि मी मागे बसलो होतो.

व्हिडीओ मध्ये विराजसने सांगितले की, पुण्यातील निलायमचा पूल चढत असताना मला असा क्षणभरासाठी भास झाला की एक पांढरी टोपी पंधरा धोतर घातलेला माणूस सायकल ओढत असताना अचानक आमच्या मधे आला. मला भास झाल्यामुळे माझ्या मित्राला मी अचानक जोरात धरल आणि त्यामुळे मित्रानेही जोरात ब्रेक दाबला आणि आम्ही थांबलो."

त्याने पुढे सांगितलं, "तो भास होता ते मला कळलं मी त्याला सॉरी म्हणणार तेवढ्यात तोच मला सॉरी म्हणला. मित्र म्हणाला, अरे सॉरी विराजास मला एकदम असा भास झाला की, कोणीतरी एकदम गाडीसमोर आलाय. मी म्हणलं भास झाला म्हणजे? तो म्हणाला काय नाही पांढरी टोपी घातलेला माणूस. मित्राचे ते शब्द ऐकून माझी तंथरली. हे ऐकल्यानंतर मी त्याला म्हणलो आता कुठेच थांबू नको लगेच घरी चल. मी ती रात्र कधीच विसरणार नाही. मला काय झालं खरंच कळलं नाही. असा काहीसा अनुभव विराजसने सांगितला आहे.

पहा व्हिडीयो-

दरम्यान, विराजसच्या या पोस्टला अनेक लोकांनी कमेंट केल्या आहेत. काहींनी असं देखील म्हटलं आहे की, नवीन नाटकाचं प्रोमोशन करा, पण तुम्ही अंधश्रद्धा वैगरे पसरवू नका. महाराष्ट्रात कायदा आहे हे लक्षात ठेवा!! तसेच काहींनी आपापले भुताबद्दलचे अनुभव देखील कमेंट्स केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramayana Collection : रणबीर कपूर-यशच्या 'रामायण'ची जगभरात धूम! १,११० कोटींची कमाई करत मोडले अनेक रेकॉर्ड

Shocking : मोठी बातमी! भाजप नेत्याच्या धावत्या कारला भीषण आग; दोघांनी कारमधून उडी मारली अन्...

Maharashtra News Live Update: ऐन दुष्काळी परिस्थितीत अमरावतीत नगरपरिषदेच्या इमारतीच्या छतावर ओली पार्टी रंगली

IAS Officer Transfer: मोठी बातमी! 38 आयएएस अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री तडकाफडकी बदल्या, प्रशासनात खळबळ

Maharashtra Weather: चक्रीवादळाचं संकट? राज्यात सकाळी थंडी, दुपारी उन्हाचा चटका; वाचा हवामान खात्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT