Vikrant Massey Baby Boy Instagram
मनोरंजन बातम्या

Vikrant Massey News: विक्रांत मेस्सीने दाखवली बाळाची पहिली झलक, पोस्ट शेअर करत सांगितलं मुलाचं नाव...

Vikrant Massey Revealed Baby Boy Name: विक्रांतने सोशल मीडियावर बाळाची पहिली झलक दाखवत त्याचं नावही सांगितलं आहे.

Chetan Bodke

Vikrant Massey Shared 1st Pic Baby Boy

'१२ वी फेल' चित्रपटामुळे अभिनेता विक्रांत मेस्सी चांगलाच प्रकाशझोतात आला होता. चित्रपट रिलीज झाल्यानंतर अभिनेत्याच्या फॅन्सलिस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी विक्रांतने आणि त्याची पत्नी शीतलने सोशल मीडियावरून गोड बातमी दिली होती. विक्रांतला आणि शितलला पुत्ररत्न झाला आहे. नुकतंच विक्रांतने आता सोशल मीडियावर बाळाची पहिली झलक दाखवत त्याचं नावही सांगितलं आहे. (Bollywood)

विक्रांतची पत्नी शीतलने ७ फेब्रुवारीला एका गोंडस मुलाला जन्म दिला. अभिनेत्यानेही आनंदाची बातमी इन्स्टाग्रामवरून सांगितली होती. आता नुकतंच अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर बाळाची पहिली झलक दाखवली आहे. त्यासोबतच त्याने बाळाचे नावही सांगितले आहे. अभिनेत्याने फोटो शेअर करताना “आशीर्वादापेक्षा कमी नाही... म्हणून त्याचं नाव ‘वरदान’ ठेवलं आहे.” असं कॅप्शन विक्रांतने फोटोला दिले आहे. अनेकांनी विक्रांतच्या बाळावर नेटकऱ्यांकडून आशिर्वाद दिला जात आहे. (Bollywood Actor)

विक्रांतने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात शितलच्या प्रेग्नेंसीबद्दल चाहत्यांना माहिती दिली होती. शितल आणि त्याच्या लवस्टोरीबाबत सांगायचे तर त्यांनी २०२२ मध्ये लग्न केले. सहसा विक्रांत मेस्सी आपल्या खासगी आयुष्याबद्दल तो चाहत्यांना काही सांगत नाही. त्याला सोशल मीडियावर आपल्या आयुष्यातील प्रायव्हेट स्पेस शेअर करायला आवडत नाही. (Bollywood News)

विक्रांत शेवटचा विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित '१२ वी फेल'मध्ये दिसला होता. त्याच्या या चित्रपटातील अभिनयाचे प्रेक्षक जोरदार कौतुक करताना दिसत आहे. याच चित्रपटासाठी त्याला यंदाचा फिल्मफेयर पुरस्कारही मिळाला आहे. बॉक्स ऑफिसवर १२ वी फेलनं (12th fail movie) मोठी कमाई केली असून चाहत्यांसह सर्वांनीच त्याचे कौतुक केले. विक्रांत लवकरच 'फिर आयी हसीन दिलरुबा' आणि 'सेक्टर ३६' मध्ये दिसणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

KDMC : कल्याणमधील कचरा संकलनाचा ठेका किती कोटींचा? अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही, पालिकेत नेमकं काय घडतंय?

Rohit Sharma : रोहित शर्माचं वाढलेलं पोट सपाट, 'हिटमॅन' झाला फीटमॅन

Yogesh Kadam on Ghaywal Gang : गुंड घायवळच्या भावाला शस्त्र परवाना कुणी दिला? मंत्री योगेश कदम यांनी केला खुलासा

SCROLL FOR NEXT