अलार्म काका..विद्याधर करमरकर यांचे मुंबईत निधन श्रेयस सावंत
मनोरंजन बातम्या

अलार्म काका..विद्याधर करमरकर यांचे मुंबईत निधन

‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली’ या जाहिरात मधील अलार्म काका आणि चित्रपट व नाटय़ सृष्टीमधील ज्येष्ठ कलाकार

श्रेयस सावंत

मुंबई : ‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली’ या जाहिरात मधील अलार्म काका आणि चित्रपट व नाटय़ सृष्टीमधील ज्येष्ठ कलाकार विद्याधर करमरकर यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते 96 वर्षांचे होते. मराठी मनोरंजक विश्वामध्ये करमरकर यांना आबा म्हणून ओळखले जात असत.

हे देखील पहा-

केवळ मराठी मध्ये नाहीतर हिंदी मध्ये देखील काही चित्रपट आणि जाहिरांत मध्ये देखील त्यांनी भूमिका साकारले होते. करमरकर यांनी आतापर्यंत ‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’, ‘गेम विथ अनुपम खेर’, ‘दोस्ती यारीयां मनमर्जिया’, ‘सास बहू और सेन्सेक्स’, ‘लंच बॉक्स’, ‘एक थी डायन’, ‘एक व्हिलन’ यासारख्या अनेक सिनेमांमध्ये आपली भूमिका साकारली आहे.

विद्याधर करमरकर यांच्या निधनावर सिनेसृष्टीतील कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. ते विलेपार्ले या ठिकाणी राहत होते. त्यांनी सुरुवातीला नोकरी करुन, अभिनयाची आवड जोपासली होती. यानंतर अनेक नाटकांमध्ये देखील त्यांनी काम केले आहे. त्यासोबत काही चित्रपटांचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parenting Tips: मुलांना टिव्ही मोबाईलपासून दूर ठेवायचंय? मग करा 'या' गोष्टी

Maharashtra Live News Update : नाशिक महापालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक रामकुंड परिसरात दाखल

Anushka Sen : अनुष्का सेनचा बॅकलेस गाउन लुक पाहिलात का?

Vaibhav Taneja Tesla : एलोन मस्क यांच्या अमेरिका पार्टी'मध्ये मोठी जबाबदारी पार पाडणारे वैभव तनेजा नेमके कोण?

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे हे सूर्याजी पिसाळाची औलाद; गोपीचंद पडळकरांची टीका करताना जीभ घसरली|VIDEO

SCROLL FOR NEXT