vidyadhar joshi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vidyadhar Joshi: 'सोनं खरेदी करणं म्हणजेच विनोद'; मोदींच्या आवाहनावर प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची मार्मिक पोस्ट

vidyadhar joshi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनावर अभिनेते विद्याधर जोशी यांनी फेसबुक पोस्टद्वारे मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या पोस्टवर जोरदार चर्चा रंगली आहे.

Shruti Vilas Kadam

Vidyadhar Joshi: इराण-इस्रायल युद्ध आणि वाढत्या खनिज तेलाच्या किमतींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी देशवासीयांना इंधन, परकीय चलन, सोनं आणि इतर संसाधनांची बचत करण्याचे आवाहन केले होते. पेट्रोल-डिझेलचा वापर मर्यादित ठेवणे, पुढील एक वर्ष सोन्याची खरेदी टाळणे आणि परदेश दौरे कमी करणे, असे सल्ले पंतप्रधानांनी दिले होते. या आवाहनावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत असताना आता मराठी अभिनेते विद्याधर जोशी यांच्या फेसबुक पोस्टची सोशल मीडियावर मोठी चर्चा होत आहे.

विद्याधर जोशी यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये अत्यंत उपरोधिक आणि मार्मिक शब्दांत आपली भूमिका मांडत म्हणाले, 'काल फार Disturbed होतो, काय करावं सुचत नाही,
गेल्या सात-एक वर्षात मी परदेश प्रवास केलेला नाही. आताचे तिकिटांचे दर आणि एकूण पाहता पुढे २-४ वर्षही जाता येणार नाही. आपल्या देशात दोन वर्षांत एखादी ट्रिप होते. पण विमानाचं तिकीट लवकर आणि स्वस्त असेल तेव्हा काढतो. आता महिन्याभरापूर्वी हिमालयात गेलो होतो पण तेव्हा मोदी सर काटकसरीच बोलले नव्हते...

विद्याधर जोशी पुढे म्हणाले, वर्क फ्रॉम होम माझ्या बाबतीत शक्य नाही. (आरशात बघून Acting करावी लागेल) पब्लिक ट्रॉन्सपोर्ट एकदा मोदी सर मुंबईत येऊन स्वतः वापरून बघतील तेव्हा त्यांना गंमत कळेल, ( बरं आमची Work Place असते मढ, घोडबंदर रोड, मिरारोड.. तिथे पोहोचेपर्यंत माझं वय वाढेल.) आता तेलाचं म्हणाल तर आमच्या घरी ‘तळणं ‘ कमीच असत… माझी शेती नाही, ऑरगॅनिक पटकन मिळत नाही, मिळालं तरी परवडेल असे भाव नसतात… सोन विकत घ्यावं हा विचार मनात येणं म्हणजे मोठ्ठा विनोद…! स्वदेशीबद्दल बोलून उपयोग नाही, साधं चिनी वापरायचं नाही, असं ठरवलं तरी शक्य नाही हे मोदी सरही मान्य करतील!!!… घरात वीजही जपून वापरतो. करू काय आता???? ( त्यातल्या त्यात मुंबईत इमारती म्हणा किंवा एकूणच जो विकास झालाय त्याने उष्णता इतकी वाढली आहे की गच्चीवर तवा ठेवून पोळ्या भाजता येतात का ते बघावं म्हणतो!! )

दरम्यान, विद्याधर जोशी यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काहींनी त्यांच्या स्पष्टवक्तेपणाचे कौतुक केले, तर काहींनी पंतप्रधानांच्या आवाहनाचे समर्थन केले आहे. एका नेटकऱ्याने कमेंट केली, बाप रे मोदींना हे अजून कळलं कसं नाही की सुशिक्षित शहरी जनतेला बऱ्यापैकी फोड करुन सांगावे लागते, ही सक्ती नाही हे पण सांगायचे . आर्थिक साक्षरता, आंतरराष्ट्रीय राजकारण या तर खूप लांबच्या गोष्टी आहेत. असो. आणखी एकाने कमेंट केली, अगदी सत्य परिस्थिती मांडली सर तुम्ही .. कोरोना म्हणजे मोदींच्या म्हणण्याप्रमाणे शतकातील मोठे संकट होते तेव्हा, तेव्हाचे सरकार वर्क फ्रॉम होम करायचा सल्ला देत होते.. त्यावेळीस आताच्या सत्ताधार्यानी काय काय तारे तोडले होते.. असो

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Care Tips : फक्त ५ मिनिटांचा उपाय! अ‍ॅलोवेरामुळे नखे होतील मजबूत

केस लवकर वाढवण्यासाठी सकाळी की रात्री तेल कधी लावावे? योग्य वेळ काय?

Maharashtra News Live Update: पुण्यात भर पावसात काँग्रेसचं आंदोलन

Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनाआधी लाडक्या बहिणींना मोठा धक्का! ₹1,500 अचानक बंद? सरकारकडून स्पष्टीकरण

High Blood Pressure : हाय बीपीच्या रुग्णांसाठी कोणती भाजी, फळ अन् पीठ सुपरहेल्दी?

SCROLL FOR NEXT