Vidya Balan
Vidya Balan  Instagram @balanvidya
मनोरंजन बातम्या

Vidya Balan: विद्या बालनचा कसा होता फिल्मी दुनियेतील प्रवास, जाणून घेऊया तिच्याविषयीच्या काही खास गोष्टी

Pooja Dange

Vidya Balan Birthday Special: बॉलिवूडची अत्यंत प्रतिभावान आणि सुंदर अभिनेत्री विद्या बालन आज तिचा ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉक्स ऑफिसवर विद्या बालन तिच्या पॉवर-पॅक कामगिरीसाठी ओळखली जाते. विद्याने तिचा वाढदिवस पती आणि निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरसोबत वाढदिवस साजरा करण्याची योजना केली आहे.

2022 हे वर्ष विद्या बालनसाठी खूप खास ठरले आहे. पद्मश्री प्राप्त विद्या बालनला तिच्या एकमेव प्रदर्शित झालेल्या 'जलसा'ला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे, अभिनेत्रीने स्वतःला सर्व विवाद आणि टीकांपासून दूर ठेवून तिचे खाजगी आणि व्यावसायिक जीवन संतुलित ठेवण्यास यशस्वी झाली आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेती विद्या बालनच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्या आयुष्यातील माहित नसलेल्या खास गोष्टी.

विद्या बालन बंगाली असल्याचा अनेकांचा गैरसमज आहे. विद्या बालन तामिळ आहे, मुंबईतील तामिळ ब्राह्मण कुटुंबात विद्याचा जन्म झाला. ती मुळची केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील आहे. विद्यांची दुसरी चुलत बहीण प्रिया मणी ही देखील राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री आहे.

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या विद्याने वयाच्या १६ व्या वर्षी एकता कपूरच्या प्रसिद्ध शो 'हम पांच'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. राधिकाची भूमिका साकारून तिने प्रेक्षकांचे प्रेम मिळवले. मालिकेतून यश मिळविल्यानंतर तिने टेलिव्हिजनला रामराम केला आणि चित्रपटात काम करण्याच्या वाटचालीस सुरूवात केली.

विद्या बालनने आर माधवनच्या 'रन' मध्ये एक आश्वासक प्रोजेक्ट मिळवला, जो बॉक्स ऑफिसवर एक मोठा ब्लॉकबस्टर ठरला. विद्याला या चित्रपटातून वगळण्यात आले आणि तिच्या जागी मीरा जास्मिनची निवड करण्यात आली. तिला पुन्हा तिच्या नशिबात खडतर संघर्ष आला. त्यानंतर तिला 'बाला' नावाच्या चित्रपटातून वगळण्यात आले आणि तिची जागा पुन्हा मीरा जस्मिनने घेतली. विद्याला 'मनस्सलम'मध्ये मुख्य भूमिकेसाठी साइन करण्यात आले पण या चित्रपटामध्ये सुद्धा तिची जागा त्रिशाने घेतली.

विद्याच्या पदव्युत्तर पदवीच्या काळात, तिला 'चक्रम' चित्रपटात सुपरस्टार मोहनलालच्या विरुद्ध मुख्य भूमिकेत काम मिळाले होते. चित्रपटाचे पहिले शेड्यूल पूर्ण करून तिने इंडस्ट्रीत आणखी काही चित्रपट साइन देखील केले होते. परंतु 'चक्रम' बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला नाही. यावेळी विद्या बालनला 'अनलकी हिरोईन'चा टॅग मात्र मिळाला. तिने तिच्या मल्याळम प्रोजेक्ट 'कटारी विक्रमन'चे शूट देखील पूर्ण केले होते, हा देखील चित्रपट प्रदर्शित झाला नाही.

त्यानंतर तिने पुनरागमन केले. दरम्यान तिचे मतभेद झाल्यामुळे तिने चित्रपट सोडला. त्यामुळे दिग्दर्शकाने तिला अव्यावसायिक अभिनेत्री म्हणून ठपका लावला.

बंगाली चित्रपटातील 'भालो देखो' या चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर विद्याला 'परिनीता' चित्रपट ऑफर झाला. अनेक ऑडिशन आणि स्क्रीन टेस्ट झाल्यानंतर सहा महिन्यांनी विद्या बालन या चित्रपटासाठी सिलेक्ट झाली. या चित्रपटाला भरभरून यश मिळाले. तसेच हा चित्रपट विद्याच्या यशाची पायरी ठरला.

विद्या बालनने 'द डर्टी पिक्चर' आणि 'कहाणी'सारख्या चित्रपटामध्ये काम करून यशाची शिखरे पार केली. विद्या बालनने तिच्या ड्रीम रोलविषयी देखील सांगितले आहे. विद्याला चार्लीने चॅप्लिन किंवा 'मिस्टर इंडिया'मधील श्रीदेवीसारखे एखादे पात्र साकारायचे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT