vidhu vinod chopra Google
मनोरंजन बातम्या

Vidhu Vinod Chopra : १९८१ चा चित्रपट फ्लॉप झाल्यावर दिग्दर्शकाच्या आत्महत्येचा प्रयत्न; आज बॉलीवूडवर करतोय राज्य !

Vidhu Vinod Chopra failure : 'मुन्नाभाई', 'लगे रहो मुन्ना भाई', '12th फेल' असे अनेक अविस्मरणीय चित्रपट देणाऱ्या या बॉलीवूड दिग्दर्शकाने आपला पहिला चित्रपट फ्लॉप होताच आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Vidhu Vinod Chopra : चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे निर्मात्यांना कोट्यवधींचे नुकसान होते आणि त्यांना मोठा धक्काही बसतो. बऱ्याच वेळा चित्रपट फ्लॉप झाल्याचा निर्मात्यांवर इतका मानसिक परिणाम होतो की ते अनेक वर्षे चित्रपटातून ब्रेक घेतात. पण बॉलिवूडमध्ये एक असा चित्रपट निर्माता आहे ज्याचा पहिला चित्रपट फ्लॉप झाला आणि तो इतका निराश झाला की त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. दिग्गज दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांनी १३ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या 'झिरो से रीस्टार्ट' या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, त्यांचा पहिला चित्रपट फ्लॉप झाल्याने त्यांच्या सर्व आशा संपल्याचा उल्लेख केला.

चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका मुलाखतीत बोलताना दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा म्हणाले, 'बरेच लोक हे खोटे मानतात आणि त्यावर विश्वास ठेवत नाहीत. पण चित्रपट फ्लॉप होताच मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता, हे अगदी खरे आहे. मी एका वेगळ्याच जगात वावरत होतो. मी लोणावळा हायवेवर उभा राहून माझ्या दिशेने येणाऱ्या ट्रककडे बघत होतो.

'हा' चित्रपट चांगलाच फ्लॉप झाला होता

विधू विनोद चोप्रा पुढे सांगतात की, आपल्या कुटुंबाचा आणि प्रियजनांचा विचार करून मी माझी पावले मागे घेतली आणि आत्महत्या केली नाही. ही घटना 'सजाये मौत' या माझ्या डेब्यू चित्रपटानंतरची आहे. १९८१ मध्ये आलेला 'सजाये मौत' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप झाला होता. या चित्रपटामुळे मला प्रेक्षकांनी पूर्णपणे नकारले होते.

‘रिस्टार्ट फ्रॉम झिरो’ला प्रेक्षक मिळाले नाहीत

ते पुढे म्हणतात, 'जे लोक मला जवळून ओळखतात त्यांना आश्चर्य वाटेल की मी असा विचार केला किंवा असा विचार माझ्या मनात आला. पण आपण नेहमीच आपली लढाई लढत असतो काहींमध्ये आपण जिंकतो आणि काहींमध्ये हरता. जीवनाचा आनंद जिंकण्यात नाही तर प्रत्येक लढाई धैर्याने लढण्यात आहे. माझा 'रीस्टार्ट फ्रॉम झिरो' हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या '12th फेल' चित्रपटाचा डॉक्युमेंटरी आहे. चित्रपटाचा रनिंग टाईम 1 तास 15 मिनिटांचा आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही.पण आज सगळीकडे '12th फेल'ची चर्चा सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

Asia Cup 2025 : अभिषेक-तिलकची दमदार खेळी, संजू सॅमसनही चमकला; श्रीलंकेसमोर 'इतक्या' धावांचे आव्हान

SCROLL FOR NEXT