Chava Saam Tv News
मनोरंजन बातम्या

Chhava movie Vicky Kaushal:'छावा'ने डरकाळी फोडली! १०० कोटींचा टप्पा पार; टीमनं घेतला मोठा निर्णय, चाहते खुश

Chhava movie 2025 highest grosser: 'छावा' चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये मोठ्या प्रमाणात बुकिंग होत आहे. याच पार्श्वभूमीवर 'छावा' च्या टीमनं एक मोठा निर्णय घेतला. सकाळचे शो देखील सुरू होणार आहेत.

Bhagyashree Kamble

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' हा ऐतिहासिक कथानक असलेला चित्रपट बॉक्स ऑफिसवर डरकाळी फोडत आहे. विकी कौशल अभिनीत 'छावा' २०२५ या वर्षातील आतापर्यंतचा सर्वोत्तम कमाई करणारा चित्रपट ठरलेला आहे. मिडिया रिपोर्टनुसार, देशभरात 'छावा'ने पहिल्याच विकेंडला १०० कोटींचा टप्पा पार केलाय. सगळे शो हाऊसफुल्ल झाले आहेत. त्यामुळे आता 'छावा'बाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा 'छावा' सध्या अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडण्याच्या मार्गावर आहे. सकाळ ते अगदी उशीरा रात्रीचे देखील शो हाऊसफुल्ल झाले आहेत. या चित्रपटाची थिएटरमध्ये मोठ्या प्रमाणात बुकिंग होत आहे. याच पार्श्वभूमीवर 'छावा' च्या टीमनं एक मोठा निर्णय घेतला.

सकाळचा शो लवकरच होणार सुरू

ऐतिहासिक कथा आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या लोकप्रियतेमुळे 'छावा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अधिकाधिक प्रेक्षकांना चित्रपट पाहता यावा यासाठी सकाळचा शो सुरू करण्यात येत आहे. छोट्या शहरांमधील अनेक थिएटरमध्ये सकाळच्या कार्यक्रम सुरू झाले आहेत.

मुंबईतील अनेक चित्रपटगृहांमध्ये रात्री १२:४५, १, १:१५, १:३० वाजताचे शो सुरू झाले आहेत.

पुण्यात अनेक चित्रपटगृहांनी सकाळी ६ वाजता शो सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर भारतासह दक्षिण भारतातही या चित्रपटाला खुप पसंती मिळत आहे. शनिवारी रात्री चेन्नईमध्ये ८१ टक्के आणि हैदराबादमध्ये ८८ टक्के अॅडवान्स शो बुक झाले होते. रात्री उशिरा आणि पहाटे चित्रपटाचे शो सुरू होत असल्यानं तिकिटांची किमंत निश्चितच आणखी वाढेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधान मुंबईत कुठे राहते? माहितीये का?

'युतीचं डोक्यातून काढून टाका'; महायुतीत अलबेल नाही? अजित पवार गटाचे खासदार असं का म्हणाले?

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Ravivar Upay: रविवारच्या दिवशी सूर्यदेवाची पुजा केल्यानंतर करा 'हे' उपाय; अडकलेली सर्व कामं होणार पूर्ण

Pune : पुण्यात भयंकर घडलं, कंपनीतील ३ कर्मचाऱ्यांचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू

SCROLL FOR NEXT