vicky katrina Chhaava screening  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vicky-Katrina: 'तिने मला समजून घेत...'; विकी कौशलने केले पत्नी कतरिना कैफचे कौतुक, व्हिडीओ व्हायरल

Vicky Katrina Chhaava Screening : विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाचे खास स्क्रिनिंग आयोजित केले होते. स्क्रिनिंगसाठी विकी कौशल पत्नी कतरिना कैफसह उपस्थित होता.

Shruti Vilas Kadam

Vicky-Katrina: विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट आज थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. रिलीजपूर्वी, निर्मात्यांनी काल चित्रपटाचे खास स्क्रिनिंग आयोजित केले होते. स्क्रिनिंगसाठी विकी कौशल पत्नी कतरिना कैफसह उपस्थित होता. स्क्रिनिंगमध्ये विकीने काळ्या रंगाची शेरवाणी घातली होती तर कतरिना फ्लॉरल साडीत खूपच सुंदर दिसत होती. स्क्रिनिंगमध्ये हे पॉवर कपल हातात हात घालून चालले असताना त्याच्यातील प्रेमाचे चाहते सोशल मिडीयावर कौतुक करत आहेत.

स्क्रिनिंगच्या वेळी विकी कौशलसाठी त्याचा संपूर्ण परिवार उपस्थित होता. स्क्रिनिंगमध्ये विकी कौशलचे आई-बाबा वीणा कौशल आणि शाम कौशल उपस्थित होते. विकीचा भाऊ सनी कौशल आणि त्याची कथित प्रेयसी शर्वरी देखील स्क्रिनिंगसाठी उपस्थित होते. तसेच, कॅटरिना कैफची बहीण इसाबेल देखील स्क्रिनिंगमध्ये उपस्थित होती.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना कतरिना कैफचा आनंद व्यक्त करताना विकी म्हणाला,"कटरिना या चित्रपटासाठी खूप आनंदी आहे. ती सतत मला तुझ्या छावा चित्रपटासाठी केलेल्या लूकची आठवण येते अस म्हणत आहे. तिने छावा चित्रपटातील माझे प्रत्येक पोस्टर ४ ते ५ वेळा लाईक केले आहेत.

विकी कौशलने चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान कतरिनाच्या विचारशीलतेचे कौतुक केले, "जेव्हा तुम्ही न थांबता शूटिंग करत असता, तेव्हा तुम्हाला फारसा वेळ मिळत नाही. कारण १२ तासांचे शूटिंग, त्याआधी २ तासांचे प्रशिक्षण आणि त्यानंतर २ तासांचे अॅक्शन रिहर्सल. त्यामुळे तुमच्याकडे वेळच नसतो आणि जेव्हा तुम्ही घरी परतता तेव्हा तुम्हाला फक्त झोपायचे असते. त्यामुळे कतरिना इंडस्ट्रीचा भाग असल्याने, तिने मला खूप समजून घेतले आणि पाठिंबा दिला आहे.

'छावा' हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट शिवाजी सावंत यांच्या 'छावा' या मराठी कादंबरीचे रूपांतर आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि मॅडॉक फिल्म्सचे दिनेश विजन निर्मित या चित्रपटात रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना देखील आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Green Chutney Potato Slices : हिरव्या चटणीचे झणझणीत आणि कुरकुरीत बटाट्याचे काप, एकदा करुनच बघा

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

New Year 2026 Horoscope: २०२६ हे वर्ष तुमच्यासाठी कसं असेल? वाचा संपूर्ण १२ राशींचं भविष्य

Yuzvendra Chahal: भारतीय खेळाडू युजवेंद्र चहलची तब्येत बिघडली; २ गंभीर आजारांची झालीये लागण

Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ; आधी ४२०ची केस आता घर आणि रेस्टॉरंटवर इनकम टॅक्सचा छापा, पण...

SCROLL FOR NEXT