Sara Ali Khan - Vicky kaushal At IPL Final Twitter
मनोरंजन बातम्या

CSK vs GT IPL Final: विकी-साराचं 'जरा हटके जरा बचके' सेलिब्रेशन...; चित्रपटाच्या प्रमोशनसह लुटला IPL Finalचा आनंद

Sara - Vicky Celebrate CSK Win: विकीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन विजयाचं सेलिब्रेशन करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Pooja Dange

Sara Ali Khan - Vicky Kaushal Celebration: आयपीएल फायनल सामना अखेरीस पार पडला. काल (२९ मे)ला चैन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगला. सामना पाहण्यासाठी अनेक चाहत्यांनी गर्दी केली होती. क्रिकेटप्रेमींनी तुफान गर्दी करत आवडत्या संघाला पांठीबा दिला. अनेक सेलिब्रिटींनीही या सामन्याला हजेरी लावली होती.

विकी-सारा ने घेतला मनसोक्त आनंद....

आयपीएल फायनल सामन्याला हजेरी लावणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये विकी कौशल आणि सारा अली खान यांचा देखील समावेश होता. विकी-सारा यांनी सामन्याचा मनोसोक्त आनंद घेतला. चैन्नई सुपर किंग्जने आयपीएलच्या अंतिम सामन्यात विजय मिळवला. या विजयाच्या आनंद विकी-सारालाही झाला. (Latest Entertainment News)

विकीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन विजयाचं सेलिब्रेशन करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही मॅचचा आनंद घेताना दिसत आहेत. विकी-साराने फटाक्यांच्या आतिषबाजीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीमध्ये दोघेही आनंद उड्या मारुन,ओरडून सेलिब्रेट करत असल्याचे दिसत आहेत. त्याने व्हिडीओला कॅप्शनही काहीसं हटके दिलयं. त्याने चैन्नई सुपर किंग्जच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन केल आहे.

'जरा हटके,जरा बचके.... 'असं काहीसं सेलिब्रेशन

विकी - सारा यांचा 'जरा हटके,जरा बचके.... ' हा नवीन चित्रपट सर्वांच्या भेटीला येत आहे. विकी-सारा ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्यी भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विकी-साराने आयपीएलच्या सामन्याला हजेरी लावली होती. या सामन्यादरम्यान त्यांच्या चित्रपटाच्या एका गाण्याने प्रेक्षकांची मने जिंकली.

‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटात विकी आणि सारासोबत राकेश बेदी, शारीब हाश्मी, नीरज सूद हे कलाकार देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. येत्या २ जूनला चित्रपट प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, साराचा लव्ह आजकल, कुली नंबर 1, गॅसलाइट या चित्रपटांना प्रेक्षकांनी म्हणावी तितकी खास पसंती दिली नाही. आता ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटात सारा आणि विकीची जोडी प्रेक्षकांना किती भावते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray : तरेंचं न ऐकल्याचा ठाकरेंना पश्चाताप; म्हणाले, '...तर शिवसेना फुटलीच नसती'

Google Maps Vs Mappls: गुगल मॅप्सला विसरून जा! MAPPLS अ‍ॅपमुळे प्रवाशांना करता येणार सूसाट प्रवास, वाचा खास वैशिष्ट्ये

Famous Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Maharashtra Live News Update : नगरमध्ये शिवशक्ती- भीमशक्तीचा आज जनआक्रोश मोर्चा

कोरोनानंतर 'फ्लू'नं डोकं वर काढलं, 'या' देशातील शाळा अन् डे-केअर सेंटर्स बंद; लॉकडाऊन लागणार?

SCROLL FOR NEXT