Vicky Kaushal Reveal Fashion Police Of Their Family Instagram
मनोरंजन बातम्या

Vicky Kaushal And Katrina Kaif News: कतरिना विकीच्या कोणत्या सवयीला वैतागली?, अभिनेत्याने केला खुलासा

Vicky Kaushal News: अभिनेते विकी कौशलने त्याच्यासोबत कतरिना कैफ फॅशनवरून कशी वागते, यावर भाष्य केले आहे.

Chetan Bodke

Vicky Kaushal Reveal Fashion Police Of Their Family

बॉलिवूडच्या सर्वाधिक रोमँटिक कपल पैकी एक विकी आणि कतरिना. कायमच वेगवेगळ्या कारणांसाठी ही जोडी सोशल मीडियावर चर्चेत असते. अनेकदा आपल्या हटक्या लव्हस्टोरीमुळे तर कधी त्यांच्या रोमँटिक अंदाजामुळे सुद्धा ही जोडी चर्चेत असते. विकी आणि कतरिनाने लग्नाआधी एकमेकांना डेट केलं होतं. अनेक काळ डेट केल्यानंतर त्यांनी २०२१ मध्ये राजस्थानमध्ये लग्नबंधनात अडकले. नुकताच अभिनेता विकी कौशलने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने कतरिनाच्या वागण्याबद्दल काही खुलासे केले.

अभिनेता विकी कौशलने त्याच्या फॅशनवर भाष्य केलं आहे. त्याच्यासोबत कतरिना फॅशन वरून कशी वागते, यावर भाष्य केले आहे. अभिनेत्याने हे सर्व खुलासे टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले आहेत.

अभिनेता मुलाखतीत म्हणतो, “बऱ्याचदा मला कतरिना कपड्यांवरून बोलते. अनेकदा कतरिनाने मला तू काय परिधान केलंय?, तू हे का घातलंस? असे प्रश्न विचारते. मी या वरून स्वतःला फॅशनसाठी मिनिमलिस्ट समजतो. मला माझ्या घरामध्ये जास्त कपडे ठेवायला आवडत नाहीत. माझ्याकडे घरामध्ये चार शर्ट, चार टी-शर्ट आणि चार जोड्या डेनिम इतकेच कपडे आहेत. मला जास्त फॅशन करायला आवडत नाही. मला फॅशनबद्दल कतरिना बोलून बोलून आता थकली आहे. मला कपड्यांवरून बोलणं बंद केलं आहे.”

कतरिना आणि विकीने २०२१ मध्ये राजस्थान मधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील एका भव्य- दिव्य किल्ल्यामध्ये मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. दोघांच्याही कामाबद्दल बोलायचं तर, गेल्या काही विकी ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटामध्ये झळकला होता. अभिनेता आता त्यानंतर ‘सॅम बहादूर’ मध्ये झळकणार आहे. तर कतरिना ‘टायगर ३’ आणि ‘मेरी क्रिसमस’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT