Vicky Kaushal  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Vicky Kaushal : शंभू महाराजांची मूर्ती पाहताच विकी कौशलनं केलेल्या कृतीची सर्वत्र चर्चा, नेटकऱ्यांकडून कौतुक; पाहा VIDEO

Vicky Kaushal Viral Video : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात विकी कौशल शंभू महाराजांची मूर्ती स्वीकारताना दिसत आहे. पाहा नेमकं एअरपोर्टवर काय घडले.

Shreya Maskar

विकी कौशलचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

विकीला चाहत्याने शंभू महाराजांची मूर्ती भेट दिली आहे.

विकी कौशल लवकरच 'लव्ह अँड वॉर' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) सध्या त्याचा आगामी चित्रपट 'लव्ह अँड वॉर'मुळे चांगला चर्चेत आहे. नुकताच विकी कौशल आणि रणबीर कपूरने विमानाने इकॉनॉमी क्लासने प्रवास केला. कलाकारांना विमानात पाहून प्रवाशांना देखील आश्चर्याचा धक्का बसला. आता असाच विकी कौशलचा अजून एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये विकी कौशल मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. तेव्हा विकीचा एक चाहता त्याला भेटला. दोघांमध्ये छान संवाद देखील झाला. त्या चाहत्याने विकी कौशलला शाल दिली. तसेच विकीला छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती देखील भेट म्हणून दिली. विकी कौशलला त्याच्या 'छावा' चित्रपटामुळे खूप लोकप्रियता मिळाली. 'छावा' चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली.

छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती स्वीकारताना विकी कौशलने केलेल्या कृतीमुळे सर्वांना आनंद झाला. विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांचा मान राखत मूर्ती स्वीकारताना पायातून बूट काढून चाहत्याकडून आदराने मूर्ती स्वीकारली. विकी कौशलच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. तसेच नेटकऱ्यांकडून देखील व्हिडीओवर कमेंट्साचा वर्षाव होत आहे. विकी कौशलचे संस्कार आणि त्याची आदर भावना यातून दिसून येते.

लव्ह अँड वॉर

विकी कौशल संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'लव्ह अँड वॉर'मधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि विकी कौशल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'लव्ह अँड वॉर' हा एक रोमँटिक-ड्रामा असून हा एक हिस्टोरिकल ड्रामा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; महामार्गावर ४ वाहनांची एकमेकांना धडक

Maharashtra Live News Update: हसन मुश्रीफ यांची पुन्हा शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका

उज्ज्वला थिटेंना धक्का, अनगरचा नगराध्यक्ष ठरला; जिल्हा न्यायालयानं नेमका निकाल काय दिला? VIDEO

India Tourism : काश्मीर-मनाली नाही; गुलाबी थंडीत आवर्जून फिरा 'हे' ठिकाण, जोडीदार होईल खुश

Blouse Fitting Tips: पहिल्यांदा ब्लाउज शिवायला देताय? मग परफेक्ट फिटींगसाठी लक्षात ठेवा या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT