Yash Shirke
'छावा' या चित्रपटामध्ये विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे.
अमोल कोल्हे यांनी 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली होती.
२०१७ मध्ये 'स्वराज्यरक्षक संभाजी' ही मालिका छोट्या पडद्यावर सुरु झाली होती.
अभिनेता गश्मीर महाजनीने 'सरसेनापती हंबीरराव' या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली होती.
विशेष म्हणजे गश्मीरने या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही भूमिका साकारल्या होत्या.
'शिवरायांचा छावा' या चित्रपटात भूषण पाटील या अभिनेत्याने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली होती.
हा चित्रपट दिग्पाल लांजेकर यांच्या श्री शिवराज अष्टक चित्रपटमालिकेतील सहावा चित्रपट आहे.
ठाकूर अनुप सिंह या अभिनेत्याने 'धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज' या चित्रपटात शंभूराजे यांची भूमिका निभावली होती.
हा चित्रपट मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता.
Next : 'सांबार'चं नाव कसं पडलं? छत्रपती संभाजी महाराजांशी आहे कनेक्शन