Yash Shirke
दक्षिणात्य खाद्यसंस्कृतीमध्ये सांबार या पदार्थाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
इडली, वडा खाताना नारळाच्या चटणीसोबत चविष्ट सांबार खाल्ले जाते.
पण सांबार हा पदार्थ कुठून आला तुम्हाला माहीत आहे का?
विकीपीडियानुसार, इतिहासात पहिल्यांदा सांबार छत्रपती संभाजी महाराज यांच्यासाठी बनवण्यात आले होते.
छत्रपती संभाजी महाराज तंजावर दौऱ्यावर असताना सांबारचा जन्म झाला असे म्हटले जाते.
शंभूराजाच्या डाळीची आमटी बनवण्यासाठी कोकमच्या जागी चिंचेचा वापर करण्यात आला.
चिंचेमुळे आमटी अधिक चविष्ट झाली आणि ती छत्रपती संभाजी महाराजांनाही प्रचंड आवडली.
जेवणात वाढण्यात आलेल्या नव्या पदार्थाचे नाव छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावावरुन सांबार असे ठेवण्यात आले.
Next : छत्रपती शिवाजी महाराज यांना किती मुलं होती?