Katrina Kaif at Mumbai Airport Saam TV
मनोरंजन बातम्या

Katrina Kaif Pregnancy Rumours: विकी-कतरिनाच्या घरी नवा पाहुणा येणार? नेटकऱ्यांनी वर्तवला अंदाज

Is Katrina Kaif Pregnant?: सोशल मीडियावर सध्या कतरिना कैफची खूप चर्चा सुरु आहे. कतरिने कैफ प्रेग्नंट असल्याचे म्हटले जात आहे. कतरिना एअरपोर्टवर स्पॉट झाल्यानंतर या चर्चा सुरु झाल्या आहेत.

Abhilash Patel

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफच्या एका व्हिडीओवरुन नेटकऱ्यांमध्ये उलट-सुलट चर्चा रंगत आहेत. एअरपोर्टमधील या व्हिडीओमध्ये तिने लूज कपडे घातल्याने ती प्रेग्नंट आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडलाय. ओव्हरसाईझ व्हाईट शर्ट आणि ब्लॅक जॅकेटसोबत जॉगर्स, असा लूज कपड्यांचा पेहराव करुन कॅटरिना आपला 'बेबी बम्प' लपवत असल्याचे एका नेटिझनने म्हटले आहे.

कतरिना प्रेग्नंट असल्याच्या चर्चा आधीपासून रंगत आहेत. तसेच सध्या कतरिना कोणत्याही समारंभात दिसून आलेली नाही. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या संगीत कार्यक्रमातही विकी कौशलसोबत कतरिना हजर नसल्याचे दिसले. त्यावेळी विकीने कतरिना मुंबईबाहेर असल्याचे मीडियाला सांगितले. आता कतरिना मुंबईत परतल्यानंतर तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

सध्या विकी कौशलच्या 'बॅड न्यूज' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. त्यावेळी मीडियाने त्याला गुड न्यूज कधी देणार? असा प्रश्न केला होता. तेव्हा 'वेळ आल्यावर तुम्हाला सांगूच, सध्या तरी बॅड न्यूज एन्जॉय करा', असे म्हणत विकीने चर्चांना पूर्णविराम दिला होता. मात्र कॅटच्या या व्हिडीओने चर्चेचे रान पुन्हा एकदा उठवले आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणीला मुख्यमंत्र्यांकडून खास पोशाख | VIDEO

Bhandara News : नवं घर बांधल्याचा आनंद गगनात मावेना! रोज नव्या घरी झोपायला जायचे, एका रात्री आक्रित घडलं अन्...

Maharashtra Live News Update: अहिल्यानगरातील महात्मा फुले चौकात भीषण अपघात

Uttar Pradesh Heartbreaking : शाळेचा पहिला दिवस, कारमधून उतरला अन् धाडकन जमिनीवर कोसळला; १२ वर्षाच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Nilesh Sable: निलेश साबळेला 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातून का हटवलं, जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT