Bhupinder Singh saam tv
मनोरंजन बातम्या

'मेरा रंग दे बसंती...' या गाण्याचे गायक भूपिंदर सिंह यांचे निधन; सिनेसृष्टीवर शोककळा

सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक भूपिंदर सिंह यांचं आज निधन झालं आहे. भूपिंदर सिंह हे ८२ वर्षांचे होते. आज त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला.

श्रेयस सावंत

मुंबई : सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक भूपिंदर सिंह यांचं आज निधन झालं आहे. भूपिंदर सिंह हे ८२ वर्षांचे होते. आज त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. भूंपिदर सिंह यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. (Veteran Playback singer Bhupinder Singh passes away)

भूंपिंदर सिंह यांच्या पत्नी मिताली सिंह यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, 'भूंपिंदर सिंह हे अनेक दिवसांपासून आजारी होते. अनेक आजारांशी त्यांची झुंज सुरू होती.' भूपिंदर सिंह यांच्या मृत्यूमुळे हिंदी सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

भूपिंदर सिंह यांनी हिंदी सिनेसृष्टीत आपल्या आवाजाची छाप निर्माण केली. तसेच त्यांनी मोहम्मद रफी, तलत महमूद आणि मन्ना डे यांच्यासोबत अनेक गाणी गायली आहेत. 'मेरा रंग दे बसंती चोला', 'प्यार हमें किस मोड पे ले आया', 'हुजूर इस कदर', 'एक अकेला इस शहर मे', 'जिंदगी मिलके बिताएंगे', 'बीती ना बितायी रैना', 'नाम गुम जाएगा' ही त्यांची गाणी तुफान गाजली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ गायक भूपिंदर सिंह यांना श्रद्धांजली

'आपल्या भावस्पर्शी आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा कलावंत हरपला आहे,' अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ (Eknath Shinde) शिंदे यांनी ज्येष्ठ गायक भूपिंदर सिंह यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली आहे.

'मनाचा ठाव घेणाऱ्या आपल्या आवाजाने भूपिंदर सिंह यांनी अनेक गझल अजरामर केल्या. त्यांचा धीरगंभीर आणि भावस्पर्शी आवाज रसिकांच्या मनात कायम स्वरुपी रुंजी घालत राहील. ज्येष्ठ गायक, गझलकार भुपिंदर सिंह यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

Breaking : मोठी बातमी! लडाख हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू; अखेर सोनम वांगचुक यांना अटक, इंटरनेट सेवाही बंद

SCROLL FOR NEXT