Veteran film producer A Krishnamurthy passed away  Saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Producer Death: हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज निर्माते काळाच्या पडद्याआड; 'या' गंभीर त्रासामुळे राहत्या घरी निधन

Famous Bollywood Producer Death: ज्येष्ठ चित्रपट निर्मात्यांचे निधन झाले. त्यांनी देहदान करून समाजासाठी आदर्श घातला. त्यांच्या निधनाने हिंदी-दाक्षिणात्य सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

Shruti Vilas Kadam

Famous Bollywood Producer Death: हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ निर्माते ए. कृष्णमूर्ती यांचे शुक्रवारी 3 एप्रिल रोजी निधन झाले. वांद्रे पाली हिल येथील त्यांच्या निवासस्थानी श्वसनाच्या त्रासामुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे निधन वयाच्या 92 व्या वर्षी झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.

ए. कृष्णमूर्ती यांनी आपल्या आयुष्यात केवळ चित्रपटसृष्टीत मोठे योगदान दिले नाही, तर निधनानंतरही समाजासाठी आदर्श घालून दिला. त्यांनी सुमारे 10 ते 12 वर्षांपूर्वीच आपले देहदान करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांचा मृतदेह सायन येथील के. जे. सोमय्या मेडिकल कॉलेजला वैद्यकीय अभ्यासासाठी दान करण्यात आला आहे.

ए. कृष्णमूर्ती त्यांचे पुत्र रवी शंकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “माझ्या वडिलांनी 10 वर्षांपूर्वीच देहदानाचा निर्णय घेतला होता. माझ्या आईनेही त्यांच्यासोबत देहदानाचा फॉर्म भरला होता. हा निर्णय त्यांनी एकत्र घेतला होता.”

ए. कृष्णमूर्ती यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली. घर एक मंदिर, सिंदूर, हिम्मतवाला, आग, मेरे दो अनमोल रतन आणि चरणों की सौगंध यांसारख्या चित्रपटांमुळे त्यांचे नाव घराघरात पोहोचले.

चित्रपट निर्मितीसोबतच त्यांनी काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अभिनयही केला होता. शिस्तबद्ध कामकाज आणि उत्कृष्ट निर्मितीसाठी ते ओळखले जात. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत शोककळा पसरली असून, अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ए. कृष्णमूर्ती यांच्या जाण्याने एक अनुभवी निर्माता आणि मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या कार्याची आणि सामाजिक बांधिलकीची आठवण कायम राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

Maharashtra News Live Update: गोविंद बागेत शरद पवारांकडून ‘शरद मॅंगो’ची लागवड आणि AI तंत्रज्ञानाधारित ऊस पिकाची पाहणी

Bullet Train: मुंबई-पुणे प्रवास फक्त 40 मिनिटांत; पुणे, सोलापूरसह 25 हून अधिक शहरं जोडली जाणार! हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला वेग

Churchgate Tourism : काळे ढग, रिमझिम पाऊस अन् हिरवीगार मुंबई! वीकेंडला फिरा 'ही' ५ निसर्गरम्य ठिकाणे

३ वर्षे काम केलं, पैसे मिळाले नाहीत! २०० कोटींच्या थकीत बिलांसाठी ठेकेदार आक्रमक

SCROLL FOR NEXT