Jabbar Patel Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jabbar Patel: शाहू महाराज हे लोकशाही नसतानाही...; ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल ३९ वा शाहू पुरस्काराने सन्मानित प्रदान

Jabbar Patel: कोल्हापुरात लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमात यंदाचा ३९ वा 'शाहू पुरस्कार' ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना प्रदान करण्यात आला.

Shruti Vilas Kadam

Jabbar Patel: कोल्हापुरात लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमात यंदाचा ३९ वा 'शाहू पुरस्कार' ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना प्रदान करण्यात आला. खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते हा पुरस्कार शाहू स्मारकात दिला गेला. या पुरस्कारात एक लाख रुपये रोख रक्कम, मानपत्र, शाल आणि श्रीफळ देण्यात आले.

डॉ. जब्बार पटेल यांनी पुरस्कार स्वीकारताना मिळालेली एक लाख रुपयांची रक्कम त्यांनी बाबा आमटे यांच्या आनंदवनासाठी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठी विभागून दिली. त्यांनी आपल्या भाषणात शाहू महाराजांचे सामाजिक कार्य आणि मूल्ये यांना उजाळा दिला.

डॉ. जब्बार पटेल म्हणाले, 'माझ्या आयुष्यात अनेक पुरस्कार मिळाले, पण शाहू महाराजांच्या नावाने मिळणारा हा पुरस्कार अत्यंत वेगळा आणि सन्मानाचा आहे. शाहू महाराज हे लोकशाही नसताना लोकशाहीच्या मूल्यांची जपणूक करणारे राजा होते. त्यांनी सर्वसामान्यांशी नातं जोडलं आणि पहिल्यांदा आरक्षण लागू केलं. आजही कोल्हापूर चित्रपटांचं विद्यापीठ आहे, इथं माझ्या पहिल्या सिनेमाची सुरुवात झाली. या शहराशी माझं विशेष नातं आहे.'

प्रकाश आबिटकर यांनी कार्यक्रमात जाहीर केलं की, राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टसाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून ५ कोटी रुपयांचा निधी दिला जाईल. या कार्यक्रमात अनेक मान्यवर, शाहू विचारांचे अनुयायी, आणि कलाविश्वातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोल्हापुरात शाहू महाराजांचा सामाजिक वारसा आणि त्यांच्या विचारांचा जागर पुन्हा एकदा या सोहळ्यातून दिसून आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ESIC Recruitment: सरकारी नोकरीची संधी; ESIC मध्ये भरती सुरु; पगार मिळणार १,०६,००० रुपये; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update: बार्शी तालुक्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Buldhana : अतिवृष्टीमुळे शेती गेली खरडून; कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा, शेतकऱ्याचा सरकारला प्रश्न

पुराच्या पाण्यातून घरात साप शिरला, सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू; सोलापुरमध्ये हळहळ

Thane Navratri: ठाण्यातील गरबाचे प्रसिद्ध ठिकाण; पाहा जत्रेचं अप्रतिम दृश्य

SCROLL FOR NEXT