Veteran Bollywood actor Bharat Kapoor passed away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Famous Actor Death: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते काळाच्या पडद्याआड; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

Famous Actor Death: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते भरत कपूर यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले. चार दशक अधिक कारकीर्द असलेल्या या अभिनेत्याच्या निधनाने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

Shruti Vilas Kadam

Famous Actor Death: हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते भरत कपूर यांचे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली असून, चाहत्यांसह कलाकारांनीही दुःख व्यक्त केले आहे. भरत कपूर यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावत होती.

अभिनेता अवतार गिल यांनीही 'स्क्रीन'ला या दुःखद बातमीची माहिती देत सांगितले की, भरत कपूर यांची प्रकृती अचानक बिघडली होती आणि त्यांना आधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र नंतर ते घरीच होते, जिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

भरत कपूर यांनी 1970 च्या दशकात आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. जवळपास चार दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक हिंदी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम केले. त्यांनी साकारलेल्या विविध भूमिका प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतील अशा होत्या.

भारत कपूर यांनी १९७२ मध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्यानंतर जवळपास चार दशके त्यांनी या क्षेत्रात काम केले. ते प्रामुख्याने सहाय्यक भूमिका आणि खलनायकाच्या भूमिकांमध्ये दिसून येत असत. त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये 'नूरी' (१९७९), 'राम बलराम' (१९८०), 'लव्ह स्टोरी' (१९८१), 'बाजार' (१९८२), 'गुलामी' (१९८५), 'आखरी रास्ता' (१९८६), 'सत्यमेव जयते' (१९८७), 'स्वर्ग' (१९९०), 'खुदा गवाह' (१९९२), 'रंग' (१९९३), 'बरसात' (१९९५), 'साजन चले ससुराल' (१९९६) आणि 'मीनाक्षी: अ टेल ऑफ थ्री सिटीज' (२००४) यांचा समावेश आहे.

Maharashtra News Live Update: काँग्रेस नेते राहुल गांधींच्या समर्थनार्थ नागपूर शहरातील राजभवन चौकात आंदोलन

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर विरोधक ठाम, लाठीचार्जवरुन घमासान, संसद ठप्प

Weight Gain: 'किती बारीक आहेस!' असे टोमणे ऐकू वैतागलाय? मग वजन वाढवण्यासाठी करा हा सोपा घरगुती उपाय

अनधिकृत बॅनर्सवर ठाण्यात बुलडोझर! 8 दिवसांत 1524 अनधिकृत होर्डिंग्ज हटवले

राहुल गांधींच्या नाकातून निघालं रक्त; पोलिसांनी उचलताना नाकाला दुखापत झाल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT