Veteran Actress Waheeda Rehman Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dadasaheb Phalke Award 2023: ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रेहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

Dadasaheb Phalke Award News: ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रेहमान (Veteran Actress Waheeda Rehman) यांना यंदाचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

Priya More

Veteran Actress Waheeda Rehman:

केंद्र सरकारकडून (Central Government) 'दादासाहेब फाळके पुरस्कार २०२३' (Dadasaheb Phalke Award) जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी यंदाच्या दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा केली आहे. बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान (Veteran Actress Waheeda Rehman) यांना यंदाचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा होताच वहिदा रेहमान यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज यंदाच्या पुरस्काराची घोषणा केली आहे. त्यांनी वहीदा रेहमान यांचे नाव यंदाच्या दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी जाहीर केले आहे. अनुराग ठाकूर यांनी आपल्या ट्विटमध्ये असे लिहिले की, 'वहीदा रेहमान यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल यावर्षीचा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. हे जाहीर करताना मला खूप आनंद होत आहे आणि सन्मान वाटत आहे'

त्यांनी पुढे असे सांगितले की, 'वहीदा यांचे हिंदी चित्रपटांमधील भूमिकांसाठी समीक्षकांनी कौतुक केले आहे. 'प्यासा', 'कागज के फूल', 'चौदहवी का चांद', 'साहेब बीवी और गुलाम', 'गाइड', 'खामोशी' आणि इतर अनेक चित्रपटांचा समावेश आहे. ५ दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी आपली पात्रे अतिशय सुंदरपणे साकारली आहेत.'

तसंच, 'याच कारणामुळे 'रेश्मा और शेरा' या चित्रपटातील वधूच्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने देखील सन्मानित वहीदा यांनी भारतीय स्त्रीचे समर्पण, सामर्थ्य आणि वचनबद्धतेचे उदाहरण दिले आहे. जे त्यांच्या मेहनतीने व्यावसायिक स्तरावरही उंची गाठू शकते.', असे देखील अनुराग ठाकूर यांनी सांगितले.

दरम्यान, वहीदा रेहमान यांनी हिंदीसोबतच तेलुगू, तमिळ, बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे. वहीदा रेहमान या हिंदी चित्रपटसृष्टीतील ५०, ६० आणि ७० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. ३ फेब्रुवारी १९३८ साली मुस्लिम कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला होता. लहानपणापासून त्यांना डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. पण त्यांच्या नशीबामध्ये डॉक्टर होणे नव्हते. वहीदा यांच्या फुफ्फुसामध्ये इन्फेक्शन झाले होते. त्यामुळे त्यांना शिक्षण पूर्ण करता आले नाही.

भरतनाट्यममध्ये पारंगत असलेल्या वहिदा रहमान यांना अभिनयाची प्रेरणा त्यांच्या आई-वडिलांकडून मिळाली. १९५५ मध्ये त्यांना एकापाठोपाठ दोन तेलुगू चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. तिथूनच त्यांनी आपल्या फिल्मी करिअरल सुरुवात केली. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Fire : आधी धूर, नंतर आगीचा वेढा; घाटकोपर रेल्वे स्थानकालगतच्या बर्गर शॉपला भीषण आग

Maharashtra Tourism: लोणावळा, खंडाळाही पडेल फिकं! नाशिकजवळ असलेलं 'हे' कमी गर्दीचं हिल स्टेशन तुम्हालाही पाडेल भूरळ

Home Wall Colour: वास्तुशास्त्रानुसार घराच्या भितींना कोणता रंग द्यावा?

Shivbhojan Thali: उद्धव ठाकरेंची 'शिवभोजन थाळी' योजना बंद पडणार? गैरव्यवहाराच्या तक्रारींमुळे केंद्र बंद करण्याचे आदेश|VIDEO

Rajgad To Pratapgad: राजगड ते प्रतापगड प्रवास कसा कराल? बस, रेल्वे आणि खासगी वाहन मार्ग

SCROLL FOR NEXT