Sulochana Latkar Unknown Facts Saam TV
मनोरंजन बातम्या

Sulochana Latkar News: भिकाऱ्याने दिलेल्या वस्तूची पूजा करायच्या सुलोचना दीदी; कारण वाचून अंगावर येईल काटा...

Sulochana Latkar Untold Story: एका मुलाखतीत सुलोचना दीदींनी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी दाद कोणती मिळाली, याबद्दलची किस्सा शेअर केला होता.

Chetan Bodke

Sulochana Latkar Unknown Facts: पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे काल सायंकाळी निधन झाले. वयाच्या ९४ व्या वर्षी सुलोचना लाटकर यांनी मुंबईच्या सुश्रुषा रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सुलोचना यांना गेल्या काही महिन्यांपासून श्वसनाच्या आजाराने ग्रासले होते. काल उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मराठी सिनेसृष्टीच्या दीदी म्हणून सर्वश्रुत असलेल्या सुलोचना लाटकर यांच्या अभिनयाची भूरळ आजही प्रेक्षकांवर कायम आहे. सुलोचना दीदींच्या चाहत्यांना त्या आपल्याच घरातील एक सदस्य वाटू लागल्या होत्या. एका मुलाखतीत त्यांनी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी दाद कोणती मिळाली, याबद्दलची माहिती दिली. त्यांना एकदा एका भिकाऱ्याने दिलेली भेटवस्तू आपुलकीने सांभाळून ठेवली आहे.

सुलोचना दीदींनी एकदा एका भिकाऱ्याने दिलेल्या भेटवस्तूबद्दलचा एक किस्सा शेअर केला. एका मुलाखतीत बोलताना सुलोचना दीदींनी हा प्रसंग सांगितला, “सांगते ऐका” चित्रपटाचा रौप्यमहोत्सव होता. चित्रपटाच्या त्या कार्यक्रमाला अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. कार्यक्रमाला अनेक पुण्यातील मराठी सेलिब्रिटी आवर्जुन हजेरी लावली होती. ग. दि. माडगूळकर यांना त्या कार्यक्रमामध्ये एका माणसाने त्यांच्या हातात काहीतरी गोष्ट दिली, पण ती गोष्ट त्यांच्यासाठी नव्हती. कार्यक्रम सुरू झाला. माडगूळकरांनी सर्वांची ओळख करून दिली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या हातातल्या गोष्टीबद्दल सांगितले.

माडगूळकर कार्यक्रमात म्हणतात, माझ्या मुठीत काहीतरी आहे जे, सुलोचनाबाईंनी त्यांच्या चाहत्याने त्यांच्यासाठी एक भेटवस्तू दिली आहे. ती त्यांच्यासाठी फार कौतुकाची थाप आहे. हे काहीतरी ११- १२ आणे आहेत. त्यांच्या चाहत्याने दिलेली भेटवस्तू मी त्यांना देतो. रोज त्यांनी याची पुजा करावी. माझ्या अंदाजे ही भेटवस्तू त्यांनी खर्च करू नये, त्यांच्या चाहत्याने त्यांना फार मोलाची भेट दिली आहे. कारण ती भेटवस्तू एका भिकारी माणसाने अण्णांकडे दिली होती. तो आण्णांना म्हणाला की, ही भेट तुम्ही सुलोचना दीदींना द्यावी. त्यांना माझं काम खूपच आवडलं होतं. माझा अभिनय त्यांना आवडल्याने मी त्यांना ती भेटवस्तू दिली आहे. (Marathi Actress)

सुलोचना दीदींच्या फिल्मी आयुष्यात ही दाद मोठी आणि फार वेगळी ठरली. त्यांनी माडगूळकरांचं म्हणणं ऐकून त्यांनी कायमच त्या पैशांची पूजा केली. सुलोचना दीदींच्या कामांची ही खूप मोठी चाहत्याने दिलेली पोचपावती ठरली. (Marathi Film)

२५० हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं

सुलोचना दीदींनी जवळपास सात दशकांच्या आपल्या कारकिर्दीत २५० हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आणि त्या एक प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री देखील होत्या. त्यांनी ५० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आणि आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली. अभिनेते राजेश खन्ना यांच्यासोबत त्यांनी अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले. मेरे जीवन साथी, कटी पतंग, प्रवेश आणि त्याग यासारख्या प्रसिद्ध बॉलीवूड चित्रपटांमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mula River : पावसाचा जोर ओसरला, धरणातून विसर्ग सुरूच; पवना, मुळा नदीच्या पाणी पातळी वाढण्याची शक्यता

Maharashtra Rain Live News : पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट

Gauri Kulkarni: पैठणी साडीत गौरी कुलकर्णीचं सुंदर फोटोशूट; PHOTO पाहा

Early signs of cancer: महिलांनी शरीरात होणाऱ्या 'या' 5 बदलांकडे दुर्लक्ष करू नये; कॅन्सरचे प्राथमिक संकेत असू शकतात

GK: 'या' देशात तुरुंगातून पळणे गुन्हा मानले जात नाही, कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT