Shabana Azmi On The Kerala Story Controversy Saam TV
मनोरंजन बातम्या

Shabana Azmi On The Kerala Story Controversy: द केरला स्टोरीला शबाना आजमींचा पाठिंबा... चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्यांना दिले सडेतोड उत्तर

The Kerala Story: 'द केरला स्टोरी' या चित्रपटाच्या समर्थनार्थ अभिनेत्या शबाना आजमी यांनी ट्विट केले आहे.

Pooja Dange

Shabana Azmi Shows Her Support TO The Kerala Story: 'द केरला स्टोरी' हा चित्रपट ५ मे, २०२३ रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाला विरोध होत होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हा विरोध अधिक वाढला. दाक्षिणात्य काही राज्यांमध्ये या चित्रपटाचे काही शो रद्द करण्यात आले. तर चित्रपट चित्रपटगृहांमध्ये दाखविण्यात बंदी घालण्यात आली आहे.

'द केरला स्टोरी' या चित्रपटाच्या समर्थनार्थ अभिनेत्या शबाना आजमी यांनी ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, लोक या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. हे गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या लाल सिंग चढ्ढावर बंदी घालण्या इतके चुकीचे आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना 'द केरला स्टोरी'च्या समर्थनार्थ ट्विटर करत म्हटलं आहे की, "जे लोक द केरला स्टोरीवर बंदी घालण्याविषयी बोलत आहेत ते आमिर खानच्या लाल सिंग चड्ढावर बंदी घालू पाहणाऱ्यांइतकेच चुकीचे आहेत. चित्रपट कॅरेटरल बोर्ड ऑफ फिल्म कार्टिफिकेशन पास केला आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी बोलण्याचा घटनाबाह्य अधिकार कोणालाही नाही."

'द केरला स्टोरी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर तो वादात भोवऱ्यात सापडला होता. ट्रेलरमध्ये असा दावा करण्यात आला होता की केरळमधील 32,000 मुली बेपत्ता झाल्या आणि नंतर त्या दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील झाल्या. यानंतर हा चित्रपट चर्चेचा विषय बनला आणि बराच गदारोळ झाला.

चित्रपटाच्या ट्रेलरमधील आकडे अतिशयोक्तीपूर्ण असल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे. वाढता वाद पाहून नंतर निर्मात्यांनी हा आकडा मागे घेतला आणि कथेत बदल करून या चित्रपटाची कथा तीन महिलांवर आधारित केली.

गेल्या वर्षी 11 ऑगस्ट रोजी 'लाल सिंग चढ्ढा' रिलीज होण्यापूर्वी, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाविरोधात 'बॉयकॉट बॉलिवूड' ट्रेंड सुरू केला होता. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करता करता नाही. अद्वैत चंदन दिग्दर्शित, लाल सिंग चड्ढामध्ये करीना कपूर देखील होती. अदा शर्मा स्टारर 'द केरला स्टोरी' हा चित्रपट वादग्रस्त असूनही बॉक्स ऑफिसवर चांगला कलेक्शन करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : घरातलं भांडण चव्हाट्यावर; निकालानंतर दादांचे काकांवर आरोप, VIDEO

Maharashtra News Live Updates: रश्मी शुक्ला यांची पुन्हा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

Maharashtra Politics: मनसेला EVM वर भरोसा नाय का? अपयशाची सल, EVMमधून खल?

Arjun Tendulkar: सचिनचा लेक रिकाम्या हाती परतला! अर्जुन तेंडुलकर अन्सोल्ड

Maharashtra Politics : अमित शहा मुंबईत येणार, मुख्यमंत्रिपदाची घोषणा करणार? पडद्यामागे काय घडतंय? वाचा

SCROLL FOR NEXT