Satish Shah Passes Away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Satish Shah Passes Away: खदखदून हसवणारा विनोदवीर रडवून गेला; प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

Satish Shah passes away: टीव्ही-चित्रपटातील महान हास्यकलाकार सतीश शाह यांचे २५ ऑक्टोबर २०२५ रोजी निधन झाले. किडनीशी संबंधित आजारामुळे आजारी होते .

Shruti Vilas Kadam

Satish Shah passes away : बॉलिवूड आणि टेलिव्हिजनमधील प्रसिद्ध अभिनेते सतीश शाह यांचे निधन झाले आहे. २५ ऑक्टोबर रोजी दुपारी २:३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृत्तानुसार, सतीश किडनीशी संबंधित आजाराने ग्रस्त होते. त्यांच्या मॅनेजर अभिनेत्याच्या मृत्यूची माहिती दिली. सतीश शाह यांचे अंत्यसंस्कार २६ ऑक्टोबर रोजी होणार आहेत. त्यांचे पार्थिव सध्या रुग्णालयात आहे.

७४ व्या वर्षी सतीश शाह यांनी अखेरचा श्वास घेतला. असरानी आणि पियुष पांडे यांच्या निधनाच्या बातमीतून बॉलीवूड सावरत होता तेव्हा सतीश यांच्या अचानक निधनाने इंडस्ट्रीला आणखी एक मोठा धक्का बसला. चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्री शोककळा पसरली आहे.

सतीश शाह यांनी त्यांच्या कारकिर्दीत असंख्य चित्रपटांमध्ये काम केले. पण, "साराभाई VS साराभाई" या टीव्ही शोमध्ये इंद्रवदन साराभाई, ज्याला इंदू म्हणूनही ओळखले जाते, या भूमिकेने त्यांना घराघरात लोकप्रिय केले. या कॉमेडी शोमध्ये सतीश यांचा अभिनय उल्लेखनीय होता. आजही या शोच्या क्लिप्स इंस्टाग्रामवर व्हायरल होतात.

सतीश यांचा जन्म मांडवी, गुजरात येथे झाला. झेवियर कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये शिक्षण घेतले. 1972 मध्ये सतीशने डिझायनर मधु शाहशी लग्न केले. कोविड-19 साथीच्या काळात, ते कोविड-19 संक्रमित झाले होते. सतीश शाह यांनी आपल्या करिअरची सुरुवात एका बॉलिवूड चित्रपटातून केली होती. ‘भगवान परशुराम’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर तो "अरविंद देसाई की अजीब दास्तान," "गमन," "उमराव जान," "शक्ती," "जाने भी दो यारों," आणि "विक्रम बेताल" सारख्या चित्रपटांमध्ये दिसला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar News: सीएनजी पंपावर कर्मचाऱ्यांची मुजोरी; वाहनात गॅस भरण्यावरून दाम्पत्याला मारहाण

Maharashtra Politics: महायुतीतील कुरघोडीमुळे शिंदे नाराज? शिंदे पुन्हा दिल्ली दरबारी

Bihar Election : निवडणुकीआधीच मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; सत्ताधारी पक्षाने माजी मंत्र्यांसहित ११ आमदारांना केलं निलंबित

Eye Health: वारंवार डोळे चोळण्याची सवय आहे? तर वेळीच थांबवा, नाहीतर...

धनंजय मुंडेंना दणका! गोपीनाथ मुंडेंचे वारसदार कोण? पंकजा घेतली या दोन नेत्यांची नावे|VIDEO

SCROLL FOR NEXT