ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार पुन्हा रुग्णालयात दाखल Twitter/ @ANI
मनोरंजन बातम्या

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार पुन्हा रुग्णालयात दाखल

दरम्यान, 6 जून रोजी आरोग्याच्या समस्येमुळे त्यांना रुग्णालयाात दाखल करण्यात आले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांना पुन्हा एकदा मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. हिंदुजा रुग्णालयाचे (Hinduja Hospital) डॉ. जलील पारकर (Dr. Jalil parkar) यांनी याबाबत माहिती दिली आहे. 98 वर्षीय दिलीप कुमार यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याचे डॉ. पारकर यांनी सांगितले आहे. मात्र त्यांच्या प्रकृतीबाबत इतर माहिती द्यायला नकार दिला आहे. तर त्यांचे वय आणि प्रकृती पाहता खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या व्यतिरिक्त त्यांच्या कौटुंबिक सूत्रांकडून मिळेल्या माहितीनुसार, दिलीप कुमार यांचे हिमोग्लोबिनही कमी झाल्यामुळे आणि त्यांचे वय आणि परिस्थितीत पाहता सर्व प्रकारच्या चाचण्यांसाठी त्यांना पुन्हा दवाखान्यात दाखल केले आहे, त्यांची प्रकृती ठीक आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. दरम्यान, 6 जून रोजी आरोग्याच्या समस्येमुळे त्यांना रुग्णालयाात दाखल करण्यात आले होते. दिलीपकुमार यांना श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना पाच दिवसांनी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

गेल्या वर्षी दिलीपकुमार यांनी त्यांचे दोन धाकटे भाऊ असलम खान (88) आणि एहसान खान (90) यांना कोरोना व्हायरसमुळे गमावले. त्यानंतर त्यांनी आपला आणि लग्नाचा वाढदिवसदेखील साजरा केला नाही.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : खुशखबर! दसरा-दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹२,००० येणार, महत्त्वाची अपडेट समोर

Mumbai Accident: मुंबईत एकाच रात्री दोन भयानक अपघात; रस्ता ओलांडताना तरुणीचा मृत्यू, डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा करूण अंत

दारूची बाटली, भरलेले पेग अन्...; शवविच्छेदन विभागात रंगली दारू पार्टी; पुण्यातील YCM रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Maharashtra News Live Update: विजय संकल्प मेळाव्यातून किरण सरनाईक यांच्या विजयाचा निर्धार

CJP Protest: 'सेंट्रल पार्कमध्ये तिरंगा फडकवता येणार पण...' दिल्ली पोलिसांची CJP समोर ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT