Veen Doghatli Hi Tutena  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Veen Doghatli Hi Tutena : राजवाडेंचा रोमँटिक अंदाज अन् कँडल लाईट डिनर डेट; समर देणार स्वानंदीला गोड सरप्राईज, VIDEO एकदा पाहाच

Veen Doghatli Hi Tutena Marathi Serial Update : 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत सध्या समर-स्वानंदीचे प्रेमाचे नाते फुलताना दिसत आहे. समर स्वानंदीसाठी एक सरप्राईज प्लान करतो. राजवाडेंचा रोमँटिक अंदाज पाहून स्वानंदी भारावून जाते.

Shreya Maskar

समर देणार स्वानंदीला सरप्राईज

समर स्वानंदीसाठी कँडल लाईट डिनर डेट प्लान करतो

राजवाडेंचा रोमँटिक अंदाज पाहून स्वानंदी खुश

'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत रोज नवीन ड्रामा पाहायला मिळत आहे. मल्लिका आणि तिची मुलं मिळून समर-स्वानंदीच्या आयुष्यात अडचणी निर्माण करताना दिसत आहे. मल्लिका समर-स्वानंदीला वेगळे करण्यासाठी रोज एक नवीन प्लान करताना दिसते आणि स्वानंदी तो प्लान फ्लॉप करते. अशात आता मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. जो पाहून चाहते भलतेच खुश झाले आहेत.

प्रोमो व्हिडीओत नक्की काय?

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, स्वानंदी घरी येते, तेव्हा तिला घरात सर्व ठिकाणी अंधारा पाहायला मिळतो तेव्हा स्वानंदी समरला हाक मारत म्हणते की, "राजवाडे, अहो! हे काय आहे?" तेव्हा समर स्वानंदीला फुल देत विचारतो की, "माझ्यासोबत डिनर डेटला याल..." हे ऐकताच स्वानंदीला खूप आनंद होतो. ती लाजते आणि होकार देते.

त्यानंतर समर तिला एक सुंदर ड्रेस देतो आणि डेटसाठी तयार होण्यासाठी सांगतो. समर म्हणतो, "तुमच्यासाठीना हा ड्रेस...आता तुम्ही छान रेडी व्हा आणि खाली या...मग आपण दोघे कँडल लाईट डिनर करूया..." त्यानंतर स्वानंदी सुंदर गुलाबी रंगाचा गाऊन घालून तयार होऊन येतो. समर-स्वानंदीला पाहतच राहतो.

आता समर-स्वानंदीची डेट कशी होणार? मल्लिका काही नवीन अडचण घेऊन येणार का? हे सर्व पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रोमो व्हिडीओला कॅप्शन दिलं की, "राजवाडेंचं स्वानंदीला गोड सरप्राईज!"'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेतील सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. त्यांच्या अभिनयाचे कौतुक होताना दिसत आहे. 'वीण दोघांतली ही तुटेना' ही मालिका झी मराठी वाहिनीवर संध्याकाळी 7:30 वाजता पाहायला मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाची ज्ञानेश कुमारांना नोटीस SIR विरोधातील लढाईला कायदेशीर बळ?

काशी विश्वनाथाच्या कळसाचं सोनं चोरीला? PMO कडे तक्रार,मंदिर प्रशासनानं आरोप फेटाळले

Friday Horoscope: अडकलेली कामं पूर्ण होतील, या 4 राशींच्या नशीबी आज पैसा; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

16 ऑक्टोबरला सरकारविरोधात CJPचा तिरंगा मोर्चा, कनॉट प्लेसचं 'जंतरमंतर' होणार

Fact Check: व्हॉट्सअॅपवर 'NO' लिहाल अकाऊंटमधील पैसे गमवाल? छोट्याश्या चुकीमुळे कष्टाचे पैसे घालवून बसाल?

SCROLL FOR NEXT