'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत धक्कादायक वळण आले आहे.
'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत सध्या समर-स्वानंदीचे लग्न पाहायला मिळत आहे.
समर-स्वानंदीच्या लग्नात मोठा अडथळा आला आहे.
झी मराठी वाहिनीवरील 'वीण दोघांतली ही तुटेना' (Veen Doghatli Hi Tutena) मालिकेची सध्या सर्वत्र हवा पाहायला मिळत आहे. मालिकेत आता लग्नाचे सीन सुरू आहेत. गोवाच्या किनाऱ्यावर समर-स्वानंदी लग्न बंधानात अडकणार आहे. मात्र मालिकेत आता मोठा ट्विस्ट आला आहे. ज्यामुळे समर-स्वानंदीचे लग्न तुटणार असल्याचे पाहायला मिळत आहेत. नुकतात मालिकेचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
समर-स्वानंदीचे लग्न जुळल्यापासून मल्लिका काकूला त्यांचे नाते पटत नाही आहे. त्या या लग्नाने खुश नाही आहेत. त्यामुळे लग्न मोडण्याचा कायम प्रयत्न करताना त्या दिसत आहेत. त्यांना स्वानंदी राजवाडेंच्या घराची सून म्हणून नको. समर-स्वानंदीच्या नात्यात ती गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करते. नवीन प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, समर-स्वानंदीच्या लग्नाचे विधी सुरू असतात. स्वानंदी समरच्या गळ्यात हार घालत असते. तेव्हा समर आणि अधिराची बहीण अर्पिता येऊन म्हणते की," थांबा, हे लग्न होऊ शकत नाही..." हे ऐकताच समर-स्वानंदीला मोठा धक्का बसतो.
लग्नासाठी स्वानंदीने गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. साडीला मॅचिंग ज्वेलरी, केसांचा अंबाडा त्यात गजरा माळला आहे. मराठमोळा साज श्रृंगार करून समरचा नवरी सजली आहे. दोघांच्या कपाळावर मुंडावळ्या बांधल्या आहेत. समरने देखील पारंपरिक पोषाख केला आहे. ऑफ व्हाइट आणि गुलाबी रंगाचा सदरा त्याने परिधान केला आहे. त्यावर गुलाबी रंगाचा फेटा बांधला आहे. दोघेही या लूकमध्ये खूपच छान दिसत आहेत. गोव्याच्या किनाऱ्यावर सुंदर मंडप सजला आहे.
समर-स्वानंदीचे लग्न होणार की मोडणार? हे येणाऱ्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. आता मालिकेचे कथानक कोणते वळण घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शेअर केलेल्या या व्हिडीओला "समुद्रकिनारी मांडव सजणार, समर-स्वानंदीची वीण जुळणार..." असे खास कॅप्शन देण्यात आले आहे. 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिका झी मराठी वाहिनीवर संध्याकाळी 7:30 वाजता पाहायला मिळते. तसेच हा शाही विवाहसोहळा 29 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर पाहायला मिळमार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.