Veen Doghatli Hi Tutena SAAM TV
मनोरंजन बातम्या

Veen Doghatli Hi Tutena: समर-स्वानंदीचा थाटच न्यारा! गोव्यात लग्न अन् मुंबईत केळवण; पाहा शाही विवाह सोहळ्याचा VIDEO

Summer Swanandi Grand Wedding Video : 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत सध्या समर-स्वानंदीच्या लग्नाची लगबग पाहायला मिळत आहे. विधीवध लग्न सोहळा पार पडताना दिसत आहे. प्रेक्षक मालिकेला उत्तम प्रतिसाद देत आहेत.

Shreya Maskar

झी मराठी वाहिनीवरील 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिका सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे.

गोव्याच्या किनाऱ्यावर समर-स्वानंदी लग्न बंधनात अडकणार आहेत.

समर-स्वानंदीच्या लग्नाचे सर्व कार्यक्रम थाटात पार पडत आहेत.

सध्या सर्वत्र समर-स्वानंदीच्या लग्नाची चर्चा पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर समर-स्वानंदीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. झी मराठी वाहिनीवरील 'वीण दोघांतली ही तुटेना' (Veen Doghatli Hi Tutena) मालिका प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. या मालिकेत मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता सुबोध भावे झळकले आहे. कार्यक्रमात अगदी खऱ्या आयुष्यात घडते तसे विधीवध लग्न होताना दिसत आहेत.

नुकताच समर-स्वानंदीच्या लग्नाचा खास व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जे पाहून चाहते देखील आश्चर्यचकित झाले आहेत. समर-स्वानंदीचा शाही विवाह सोहळ्या गोव्याच्या किनाऱ्यावर पार पडणार आहे. नुकतेच मुंबईतील एका हॉटेलमध्ये समर-स्वानंदीचे केळवण पार पडले. तसेच समर-स्वानंदीच्या लग्नाची पत्रिका गणरायाच्या चरणी ठेवली. लग्न सोहळ्यातील कार्यक्रम एकामागोमाग एक थाटात पार पडत आहेत. समर-स्वानंदीला एकमेकांची उष्टी हळद लागली. स्वानंदीच्या हातावरील मेहंदीत समरचे नाव सजले.

वेडिंग व्हिडीओमध्ये समर-स्वानंदीच्या लग्नाची झलक पाहायला मिळत आहे. तसेच त्यांचे गोड क्षण पाहून चाहते भारावून गेले आहेत. या व्हिडीओला खूपच खास कॅप्शन देण्यात आले आहे. यात लिहिलं की, "संपूर्ण महाराष्ट्राला आतुरता असणाऱ्या महाविवाह सोहळ्याचे साक्षीदार व्हायला विसरू नका...!" लग्नातील समर-स्वानंदीचा हटके लूक प्रेक्षकांना खूप आवडला आहे. तसेच तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांच्या केमिस्ट्रीचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

समर-स्वानंदीच्या लग्नात अनेक अडथळे येताना दिसत आहे. आता हे अडथळे पार करून समर-स्वानंदी नवीन आयुष्याला सुरूवात करणार आहे. 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत समर-स्वानंदीच्या लग्नानंतर कोणता ट्विस्ट येतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिका झी मराठी वाहिनीवर संध्याकाळी 7:30 वाजता पाहायला मिळते. तसेच हा शाही विवाहसोहळा 29 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर पाहायला मिळमार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train : मोठी बातमी! देशात आणखी ४ वंदे भारत ट्रेन सेवेत, जाणून घ्या तुमच्या शहरातून धावणार का?

पश्चिम महाराष्ट्रात राजकीय भूकंप! बड्या नेत्यानं सोडली शरद पवार गटाची साथ; अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव कारची टेम्पोला धडक; ४ जीवलग मित्रांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: आदिती तटकरेंच्या मतदार संघात शिंदे गटाची ताकद वाढलीपदाधिकाऱ्यांची भावना

Apple cutting Tips: सफरचंद कापल्यानंतर काळे का पडतात?

SCROLL FOR NEXT