'वीण दोघांतली ही तुटेना' मालिका प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे.
मालिकेतील मराठी अभिनेत्रीने नुकतीच कार खरेदी केली.
अभिनेत्रीने फोटो शेअर करून कारची पहिली झलक दाखवली.
महाराष्ट्राची लोकप्रिय मालिका 'वीण दोघांतली ही तुटेना' सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेला प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत. अशात या मालिकेतील मुख्य अभिनेत्रीने म्हणजेच तेजश्री प्रधानने चाहत्यांना एक सरप्राइज दिले आहे. तेजश्री प्रधान एक लग्जरी कार खरेदी केली आहे. ज्याचा फोटो तिने इन्स्टाग्राम शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
तेजश्री प्रधानने गाडीसोबत एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यात अभिनेत्री ड्रायव्हिंग सीटवर बसलेली पाहायला मिळत आहे. तिच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य देखील आहे. तेजश्रीने सुंदर पिस्ता रंगाची साडी नेसली आहे. तेजश्री प्रधानने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "...आणि एक महिना उलटून गेला आहे, तसेच हा प्रवास अधिक सुखद होत चालला आहे!" अभिनेत्रीने आपल्या वाढदिवसाच्या महिन्यात ही लग्जरी कार खरेदी केली आहे. तेजश्रीने नवीकोरी मर्सिडीज खरेदी केली आहे.
तेजश्री प्रधानने शेअर केलेल्या पोस्टवर चाहते आणि कलाकार मंडळी कमेंट्स करताना दिसत आहे. अभिनेत्रीचे कौतुक होत आहे. तसेच चाहत्यांकडून प्रेमचा वर्षाव होत आहे. तेजश्री प्रधान आपल्या साध्याभोळ्या स्वभावासाठी ओळखली जाते. तिच्या अभिनयाचे लाखो चाहते दिवाने आहेत.
तेजश्री प्रधानने आजवर अनेक मराठी चित्रपट, मालिका आणि नाटके यांच्यात काम केले आहे. ती टिव्हीचा प्रसिद्ध चेहरा आहे. यात 'होणार सून मी ह्या घरची', 'प्रेमाची गोष्ट', 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकांचा समावेश आहे. 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत तेजश्री प्रधान मराठी अभिनेता सुबोध भावेसोबत काम करत आहे. 'वीण दोघांतली ही तुटेना' ही मालिका झी मराठी वाहिनीवर रोज संध्याकाळी ७:३० वाजता पाहायला मिळते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.