Veen Doghantali Hi Tutena Video SAAM TV
मनोरंजन बातम्या

Veen Doghantali Hi Tutena Video : चोराच्या उलट्या बोंबा! अंशुमन चिंगीवरच करतो घाणेरडे आरोप; स्वानंदी सत्य कसं समोर आणणार?

Veen Doghantali Hi Tutena Update : 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. अंशुमन चिंगीवरच आरोप करताना दिसत आहे. स्वानंदी अंशुमनला कसा धडा शिकवणार, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

चिंगी अंशुमनच्या बाळाची आई होणार

अंशुमन चिंगीवरच करतो घाणेरडे आरोप

स्वानंदी अंशुमनचा खोटारडेपणा सर्वांसमोर आणणार

'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत सध्या अंशुमनचे लग्न पाहायला मिळत आहे. मात्र स्वानंदीला समजते की, चिंगी गरोदर आहे आणि तिच्या पोटातील बाळ अंशुमनचे आहे. स्वानंदी आणि चिंगी मिळून अंशुमनचे लग्न थांबवताना दिसतात. त्यानंतर स्वानंदी घडलेला सर्व प्रकार समर आणि राजवाडेंच्या संपूर्ण कुटुंबाला सांगते. अंशुमनचे प्रताप ऐकून घरातील सर्वच सदस्य अंशुमनवर धडकतात. समरचा पारा देखील चढतो मात्र अंशुमन स्वतःची चुक कबूल करण्यापेक्षा चिंगीवरच घाणेरडे आरोप करतो. 'वीण दोघांतली ही तुटेना' चा नवीन प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे.

प्रोमो व्हिडीओत नेमकं काय?

अंशुमन म्हणतो की, "ही एवढी चाप्टर आहे ना, हिला माहीत आहे, हिचे हे सर्व प्रकार माझ्यापाशी खपवून घेतले जाणार नाही... म्हणून या थराला गेली आहे ही मोलकरीण... " असे बोलून अंशुमन चिंगीला चप्पलेने थोबाडीत मारायला जातो, मात्र स्वानंदी त्याला थांबवते आणि म्हणते की, "चिंगीवर नाही, तर कुठल्याच बाईवर हात उगारायचा नाही हा परत..." त्यानंतर पुन्हा अंशुमन म्हणतो की, "मला काय वेड लागलंय का? घरातील मोलकरीणीसोबत असे चाळे करायला... आमच्यासारख्या मोठ्या फॅमिलीसोबत असे स्कॅम होतच असतात... उद्या येऊन कोणी बोलले की समर राजवाडेंमुळे त्या प्रेग्नेंट आहेत, तर काय कराल?" असा प्रश्न अंशुमन स्वानंदीला करतो. आता स्वानंदी अंशुमनला कसा धडा शिकवणार आणि त्याच्याकडून सत्य कस काढून घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

झी मराठीने शेअर केलेल्या या प्रोमो व्हिडीओला "अंशुमनच्या आरोपाला काय असेल स्वानंदीचं प्रत्युत्तर?" असं कॅप्शन देण्यात आले आहे. चाहते, प्रेक्षक व्हिडीओवर भरभरून कमेंट्सचा पाऊस पाडत आहे. 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिका सध्या महत्त्वाच्या वळणावर आली आहे. भावाचे असे रूप पाहून आता समर काय करते हे पाहणे देखील मनोरंजक ठरणार आहे. मालिकेत फुल व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. 'वीण दोघांतली ही तुटेना' ही मालिका सायंकाळी ७:१५ वाजता झी मराठी वाहिनीवर पाहायला मिळते.

समर घेतो मोठा निर्णय

अंशुमनचा प्रताप ऐकल्यावर समर मोठा निर्णय घेतो. समर अंशुमनला DNA टेस्ट करायला सांगतो. समर अंशुमनला म्हणतो की, "तुला मी शेवटची संधी देतोय अंशुमन, आता तू माझ्याशी खरं बोललास ना...तर निदान मी तुझ्याशी माणूस म्हणून नीट वागेन. पण, जर तू ही जबाबदारी नाकारलीस आणि DNA टेस्टमध्ये हे मुल तुझेच असल्याचे समजले तर विषय संपला... या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद... यापुढे तुझे कोणाशीही कुठलेच नाते नसेल... "

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Update : पुढील काही तासांत केरळमध्ये मान्सून धडकणार, राज्यात मुसळधार पाऊस; 'या' जिल्ह्यांना अलर्ट, वाचा IMD चा अंदाज

Hospital Fire : हॉस्पिटलमध्ये अग्नितांडव! ICU वॉर्डात भयंकर आग, १० रुग्णांचा मृत्यू, अनेक जण गंभीर

Shirdi: कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट; ६० कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी

Politics : भाजपला जबरी धक्का, डोंबिवलीतील ४ नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Maharashtra News Live Update: विधानपरिषद निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT