Utkarsh shinde News: बिग बॉस फेम अभिनेता आणि गायक उत्कर्ष शिंदे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. शिंदेशाहीचा हा हिरा बिग बॉस मराठीचा तिसरा सिझन गाजवल्यानंतर उत्कर्ष आता अभिनय क्षेत्राकडे वळला आहे. उत्कर्ष शिंदे लवकरच 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमातून त्याच्या अभिनयाची झलक पाहायला मिळणार आहे. याचदरम्यान, उत्कर्षची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत आली आहे. (Latest Marathi News)
उत्कर्ष पेशानं डॉक्टर आहे. उत्कर्षने मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या सिझनमध्ये चातुर्य दाखवत ऑल राऊंडर म्हणून खेळात ओळख निर्माण केली होती. उत्कर्ष शिंदेच्या सोशल मीडियावर पोस्ट लक्षवेधी असतात. उत्कर्ष सध्या कोल्हापुरात 'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे. याचदरम्यान, उत्कर्ष शिंदेची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत आली आहे.
सिनेमाच्या शुटिंगसाठी उशीर झाल्यामुळे चाहत्याच्या दुचाकीवरून निघालेल्या उत्कर्षची पोस्ट चर्चेत आली आहे. उत्कर्षने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की, नको व्हायला शूटिंगला लेट म्हणून निघालो फॅन्सच्या स्कुटीवर थेट " कोल्हापूर रांगड्या मातीतल्या मवाळ प्रेमळ माणसांचं शहर आहे'.
'तर झाल असं, 'वीर दौडले सात' या आमच्या आगामी फिल्मची शूटिंग कोल्हापुरात सुरु असताना . वेळ मिळताच आम्ही जिमसाठी धावतो, नेहमी प्रमाणे प्रोडक्शनची कार सोबत असतेच, पण त्या दिवशी फोर्ज फिटनेस कोल्हापूरमधून निघालो आणि कारचा प्रॉब्लेम झाला, असे उत्कर्षने सांगितले.
उत्कर्ष पुढे म्हणाला, '..मग काय आता शूटिंगला लेट होतं की काय? या टेन्शनमध्ये असतानाच "सर आम्ही काही मदत करू का? म्हणत तितक्यात काही फॅन्स सेल्फी काढण्यासाठी आले होते, आम्ही ड्रॉप करतो, चला सर, तुम्हाला लेट होऊ देणार नाही'. त्यानंतर चक्क उत्कर्ष बिंधास्तपणे चाहत्याच्या दुचाकीवरून शुटिंगसाठी निघाला. त्यानंतर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
दरम्यान, उत्कर्ष शिंदे हा 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातून तो अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. तो या चित्रपटात सूर्याजी दांडकर यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाची शूटिंग सध्या कोल्हापुरात सुरू आहे. उत्कर्ष नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहत त्याच्या चाहत्यांशी संपर्कात राहतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.