Ved Marathi Movie Box Collection  Instagram/ @riteishd
मनोरंजन बातम्या

Ved Movie Collection 17 Days: रितेशच्या मराठमोळ्या चित्रपटानं बॉलिवूडलाही टाकले मागे, 'या' चित्रपटांचा मोडला रेकॉर्ड...

'वेड' चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे. दिवसेंदिवस चित्रपटाची क्रेझ वाढतच चालली आहे.

Chetan Bodke

Ved Movie Collection 17 Days: 'वेड' चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे. दिवसेंदिवस चित्रपटाची क्रेझ वाढतच चालली आहे. चित्रपटाच्या कमाईतही दिवसेंदिवस वाढ होतच आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड' चित्रपटाने बरेच रेकॉर्ड मोडीत काढत भारतीय चित्रपटसृष्टीत आपले स्थान पक्के केले आहे. रितेशच्या चित्रपटाने 'सैराट'चा रेकॉर्ड मोडत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

रविवारी या चित्रपटाने ३.४० कोटी रुपयांची कमाई करत आतापर्यंत ४८.४२ कोटी इतके एकूण कलेक्शन केले आहे. या आधी बॉलिवूडमध्ये रितेश देशमुखच्या मरजावां चित्रपटाने ४७.७८ कोटीची, डबल धमालने ४५ कोटी, क्या सुपर कूल हैं हम चित्रपटाने ४५.१४ कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाने बॉलिवूडमधील काही चित्रपटांचेही रेकॉर्ड मोडीत काढल्याने त्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

रितेश दिग्दर्शित चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीला आणखी एक दमदार चित्रपट दिला आहे. हा दमदार चित्रपट लवकरच आणखी एक नवा विक्रम रचणार आहे. लवकरच येत्या एक- दोन दिवसांत हा चित्रपट ५० कोटींचाही अगदी सहज पल्ला गाठेल अशी सर्वत्र चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zodiac Sign Lucky Colour: कोणत्या राशीसाठी कोणता रंग शुभ? तुमच्या आयुष्यात होईल भरभराट

Virar: विरारमध्ये सूर्या धरणाची मुख्य पाईपलाईन फुटली, ३० ते ४० फूट उंच पाण्याचे फवारे उडाले; VIDEO व्हायरल

Pineapple Sheera Recipe: सकाळचा नाश्तासाठी झटपट करा टेस्टी पायनॅपल शिरा, लहान मुलांपासून सगळे घरातले होतील खूश

Nalasopara: गटारावरील लोखंडी जाळीत महिलेचा पाय अडकला, जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल; VIDEO

Top 10 Diamonds: जगातले सर्वात मोठे TOP 10 हिरे कोणते? तुम्हाला ही माहितीये का?

SCROLL FOR NEXT