Ved Box Office Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ved Box Office Collection: रितेश जिनिलीयाच्या 'वेड'ची बॉक्स ऑफिसवर गरुडझेप, अनेक बॉलिवूड चित्रपटांना टाकले पिछाडीवर...

रितेश जिनिलीयाचा 'वेड' चित्रपट प्रदर्शन होऊन एक आठवडा उलटून गेला असला तरी, चित्रपटाने आतापर्यंत लक्षणीय कमाई केली आहे.

Chetan Bodke

Ved Box Office Collection: रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित 'वेड' चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले आहे. हा चित्रपट २०२२ या वर्षातील अखेरचा चित्रपट ठरला. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली असून प्रेक्षक अजूनही चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत आहे. चित्रपट प्रदर्शन होऊन एक आठवडा उलटून गेला असून चित्रपटाने आतापर्यंत लक्षणीय कमाई केली आहे.

चित्रपटात प्रमुख भूमिकेत जिनिलीया आणि रितेश देशमुख आहेत. या चित्रपटातून जिनिलीयाने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले असून रितेशचा हा पहिलाच दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे. एका आठवड्यातच या चित्रपटाने अनेक बॉलिवूड चित्रपटांना पिछाडीवर टाकत जबरदस्त कमाई केली आहे. रणवीर सिंगच्या ‘सर्कस’लाही या चित्रपटाने आठवड्याभरातच मागे टाकले.

चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी २ कोटी २५ लाख रुपये कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी ३ कोटी २५ लाख रुपये गल्ला जमावला. रविवारी ४ कोटी ५० लाख तर सोमवारी ३ कोटी रुपये या चित्रपटाने कमावले. चित्रपटाची ९ व्या दिवसाची कमाई पाहून तर सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं आहे.

रितेशचा 'वेड' चित्रपट एका दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक असून हा चित्रपट लोकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. ट्रेड रिपोर्ट आणि एक्स्पर्टच्या म्हणण्यानुसार ‘वेड’ या चित्रपटाने ९ व्या दिवशी तब्बल ५ कोटींचा गल्ला कमावला आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने सर्वाधिक कमाई केलेला चित्रपट ठरला आहे.

चित्रपटाला जर प्रेक्षकांनी असाच प्रतिसाद दिला तर हे आकडे येत्या काळात आणखी वाढतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. आठवड्याभरात या चित्रपटाने तब्बल २७.७२ कोटीची कमाई केली असून ही कमाई मराठी चित्रपटसृष्टीसाठी फारच अभिमानास्पद आहे.

‘वेड’ या मराठी चित्रपटासमोर अनेक बॉलिवूड चित्रपटांची जादू मात्र फिकी पडली. आता हा चित्रपट आणखी किती कमाई करणार, याकडे सर्वाचंच लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gudi Padwa 2026 : गुढीपाडव्याला फक्त ५ मिनिटांत नेसा नऊवारी साडी; 'ही' घ्या सोपी ट्रिक, सर्वात सुंदर दिसेल तुमचा मराठमोळा लूक

Backless Blouse Designs: लग्नात सुंदर दिसण्यासाठी ओपन बॅक स्टाईल ब्लाऊज, नवरीचा लूक दिसले भारी

Maharashtra Live News Update : डोसा नंतर आता वडा गायब? पुण्यात जोशी वडेवाले यांनी शाखा केल्या बंद

Summer Beauty Tips : उन्हाळ्यातही राहाल फ्रेश अन् सुगंधीत; महिलांनो 'हे' ब्युटी सीक्रेट तुम्हाला कायम घाम, दुर्गंधीपासून ठेवेल दूर

Shocking : संतापजनक! ८९ वर्षाच्या महिलेला रूग्णालयात उंदराने कुरतडले, ICU मधील भयावह घटना

SCROLL FOR NEXT