Fukrey 3 Trailer Out Instagram @fukravarun
मनोरंजन बातम्या

Fukrey 3 Trailer: दमदार डायलॉग, तुफान कॉमेडीसह चुचा आणि हनी दाखवणार त्यांचा जलवा; 'फुकरे 3'चा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित

Fukrey 3 Trailer Out: 'फुकरे 3'चा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

Pooja Dange

Fukrey 3 Release Date:

बॉक्स ऑफिसवर सद्य चित्रपटांचा सपाटा सुरू आहे. एकामागोमाग एक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. या चित्रपटांमध्ये विविध प्रकारच्या चित्रपटांचा समावेश आहे. तर आता प्रेक्षकांना हसविण्यासाठी फुकरे ३ सज्ज झाला आहे.

फुकरे ३ चित्रपटाची प्रेक्षक बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होते. काळ या चित्रपटातील कलाकारांचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. तर नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

फुकरे 3 ट्रेलर

'फुकरे ३'ची ट्रेलरची सुरुवात २०१३ ते २०२३ पासून होते. वरून शर्मा आणि पुलकित सम्राट कॉलेजमध्ये जाण्याचा विचार करत असतात. दोघांनी नापास होण्याची हॅट्रिक केलीली असते. तर त्यांचा कॉलेजमध्ये सत्कार आयोजित करण्यात येतो. दरम्यान चुचा म्हणजेच वरून शर्मा त्याची शाळेतील एक आठवण सांगतो ज्याने सर्वजण जोरजोरात हसू लागतात.

दुसरीकडे भोली पंजाबन म्हणजे रिचा चड्ढा निवडणुकीला उभी राहते. पण ती दिल्लीची वाट लावेल म्हणून तिच्या विरोधात हनी म्हणजे पुलकित सम्राट चुचाला उभं करतो. हनी, लाली म्हणजे मनजोत सिंग आणि पंडितजी म्हणजे पंकज त्रिपाठी चुचाला सपोर्ट करतात. (Latest Entertainment News)

चित्रपटातील डायलॉग आणि कॉमेडी दोन्ही दमदार आहेत. तसेच ट्रेलरमध्ये हनी, चुचा कोणत्या अडचणीत अडकणार याची झलक दाखविण्यात आली आहे. यावेळी फुकरे ३ आणखीच दमदार असणार आहेत यात शंका नाही.

फुकरे ३ चित्रपट २८ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. मानदीप लांबा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपट पहिला २०१३मध्ये आला होता तर दुसरा भाग २०१७मध्ये प्रदर्शित झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्कादायक! जन्मदात्या आई-वडिलांच्या डोक्यात मुलाने घातला वरवंटा; मृतदेहाचे तुकडे गोणीत भरले

Blouse for Every Saree: प्रत्येक बाईकडे असायला हवे कोणत्याही साडीवर परफेक्ट मॅच होणारे हे ७ प्रकारचे ब्लाउज

Slim Look In Saree: साडी नेसल्यावर जाड दिसता? ही १ टेकनिक वापरा, तुम्हीच दिसाल रेखीव

Maharashtra Live News Update: कुख्यात गुंड बंडू आंदेकरच्या वकिलावर गुन्हा दाखल

Maharashtra Politics : बंडखोरी रोखण्यासाठी जालीम उपाय; बंडखोरांची ठाकरे बंधू कोंडी करणार?

SCROLL FOR NEXT