Bawaal Trailer Shared On Social Media Instagram
मनोरंजन बातम्या

Bawaal Trailer: ‘लव्हस्टोरी अन् दुसरं महायुद्ध’; वरूण- जान्हवीचा रोमँटिक प्रवास दाखवणाऱ्या ‘बवाल’चा ट्रेलर प्रदर्शित

Bollywood Film Bawaal Trailer Shared: जान्हवी आणि वरुणच्या ‘बवाल’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

Chetan Bodke

Bawaal Trailer Shared On Social Media: नितेश तिवारी दिग्दर्शित ‘बवाल’ ची घोषणा झाल्यापासून चित्रपटाची तुफान चर्चा सुरू आहे. गेल्या काही या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून कलाकार कमालीचे चर्चेत आले. नुकताच जान्हवी आणि वरुणच्या ‘बवाल’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सध्या या ट्रेलरची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. हा ट्रेलर दुबईतील एका कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आला असून सध्या या ट्रेलरची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे.

चित्रपट येत्या २१ जुलैला प्रदर्शित होत असून या चित्रपट amazon prime video या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतोय. चित्रपटात हे दोघेही नवरा- बायको म्हणून दाखवले. काही मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये दोघांच्याही लव्हस्टोरीमध्ये एक खतरनाक ट्विस्ट अनुभवायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी पहिल्यांदाच एकत्र अभिनय केला असून जान्हवीने निशा हे पात्र तर वरुणने अजय हे पात्र साकारले.

ट्रेलरच्या सुरुवातीला, वरुणने एका शिक्षकाचे पात्र साकारले असून तो इतिहास हा विषय विद्यार्थांना शिकवतो. मुलांना हा शिक्षक चुकीचा इतिहास शिकवत असल्याचे दिसून येत आहे. लग्नानंतर ही जोडी युरोपला फिरायला बाहेर जातात.

फिरायला गेल्यानंतर या जोडीला युरोपातल्या गोष्टी कशा बदलतात, दुसरे महायुद्ध आणि हिटलरचे शहर याचा वरुण-जान्हवीच्या प्रेमकथेशी काय संबंध आहे? याचा खुलासा प्रेक्षकांना येत्या २१ जुलै २०२३ रोजी होणार आहे. अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओने ट्रेलर शेअर करत “प्रेम ते ‘बवाल’पर्यंतचा प्रवास!” असे कॅप्शन दिले आहे.

चित्रपटाबद्दल बोलायचं तर, ही जोडी या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र दिसणार आहे. ओटीटीवर या नव्या ऑनस्क्रीन जोडीला पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: पोलिसांनीच कोकेन ठेवलं; 'दृश्यम'प्रमाणे चित्र रंगवलं अन् व्हिडीओ बनवला, असीम सरोदेंचा दावा

Nag Panchami Wishes 2025 : नागपंचमीनिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या भक्तीमय शुभेच्छा

Divya Deshmukh : गँडमास्टर दिव्या देशमुखचं फडणवीसांकडून कौतुक, व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा

Mumbai Firing : मुंबई हादरली! 32 वर्षीय तरुणीवर गोळीबार, परिसरात खळबळ

Tharवाल्याचा विकृतपणा! आधी कट मारला, नंतर रिव्हर्स घेत वृद्धाच्या अंगावर घातली भरधाव कार|Video Viral

SCROLL FOR NEXT