Ankita Walawalkar And Manmohan Mahimkar News: ‘मला इच्छामरणही चालेल, पण या देशात...’; माहिमकर काकांनी अंकिताकडे मागितला मदतीचा हात

Kokan Hearted Girl New Reel: शूटिंग दरम्यान अंकिता वालावलकर हिला माहीमकर काकांनी त्यांची सध्याची बिकट परिस्थिती सांगितली.
Ankita Walawalkar Told By Manmohan Mahimkar About Her Situation
Ankita Walawalkar Told By Manmohan Mahimkar About Her SituationSaam Tv
Published On

Ankita Walawalkar Told By Manmohan Mahimkar About Her Situation: सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंकिता वालावकर सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. नेहमीच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कोकण हार्टेड गर्ल चाहत्यांमध्ये चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर महाराष्ट्रात झालेल्या सत्ताबदलाची एक व्हिडिओ शेअर केली होती. त्यामुळे तिची सोशल मीडियावर तुफान चर्चा होताना दिसली.

अशातच ती आणखी एका व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तिने एका जुन्या मराठी कलाकाराला ‘एक हात मदतीचा’ दिला आहे.

ज्येष्ठ मराठी टेलिव्हिजन अभिनेते मनमोहन माहिमकर यांना आपण अनेकदा मराठी चित्रपटाच्या माध्यमातून आणि मालिकेच्या माध्यमातून पाहिले आहे. माहिमकर हे नावाने कमी आणि चेहऱ्याने जास्त मराठी प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध आहेत. आपण त्यांना अनेकदा मराठी चित्रपटांत पाहिले आहे.

एका शूटिंग दरम्यान अंकिता वालावलकर हिला माहीमकर काकांनी त्यांची सध्याची बिकट परिस्थिती सांगितली. यावेळी माहिमकरांचा अंकिताने मान ठेवत त्यांना मी तुम्हाला मदत करेल असे आश्वासन देखील दिले. अंकिताने त्यांच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

शेअर केलेल्या व्हिडिओत अंकिता म्हणते, “गिरगांवमध्ये माझं एक शूट सुरू होतं, त्या शूटिंग दरम्यान मला तिथे माहिमकर काका भेटले होते. त्यांना मी लहानपणापासूनच स्क्रीनवर पाहत आली आहे. मी त्यांना काका तुम्ही आमच्या शूटमध्ये येणार का? अशी विनंती केली. त्यांनी आमच्या विनंतीचा मान ठेवून लगेचच तयार होऊन आले सुद्धा.”

अंकिता पुढे व्हिडिओत म्हणाली, माझी शूटिंग झाल्यानंतर मी निघत असताना माहिमकर काका मला म्हणाले, “मुली माझ्यासाठी काही काम मिळेल का? सध्या मला कामाची खूप गरज आहे. माझं लग्न झालेलं नाही, वेळ घालवायला ही माझं कुटुंब नाही. मला इच्छामरणही चालेल, पण या देशात तशी सोय नाही. मला नुसत्या पैशाची गरज नाही. मला असं काम हवंय, जेणेकरून माझा वेळ जाईल.”

व्हिडिओच्या शेवटच्या भागात अंकिता म्हणते, “ आणि त्यांचं या वयातील हे वाक्य ऐकून खरंच आपल्याला त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. मी त्यांना सांगितलं की मी एवढी मोठी नाही की, मी तुम्हाला काम देऊ शकेल. पण माझ्या संपर्कात असलेल्या सिनेसृष्टीतील लोकांपर्यंत मी तुमचा हा मेसेज नक्की पोहोचवेन. तुम्हाला नक्की काम मिळेल जेणेकरुन तुमचा वेळ जाईल. तुमचं शेवटचं आयुष्य खूप सुखात जाईल.” असं अंकिता या व्हिडिओत म्हणाली आहे.

अंकिताने तिचा आणि अभिनेते माहिमकर काकांचा हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन दिले की, “माझ्यासाठी रखुमाई बनून उभी रहा मुली. मला काम हवंय!! ही वाक्य मला झोपू देणार नाहित, त्यामुळे मी ही रिल करण्याचं ठरवलं.” तिच्या या व्हिडिओवर अनेक मराठी सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत.यावर धैर्य घोलप, अद्वैत दादरकर, अमित अवंती सह मेघना एरंडेने देखील कोकण हार्टेड गर्लच्या व्हिडिओवर कमेंट केली आहे.

मनमोहन माहिमकर यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, त्यांनी आता पर्यंत गोलमाल, जत्रा, ही पोरगी कोणाची, यंदा कर्तव्य आहे सारख्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. सोबतच नाटक आणि मालिकेतूनही प्रसिद्धी मिळवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com